दक्षिण आफ्रिका संघाने गुरुवारी (दि. ०९ जून) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाचे मोठे स्वप्न दक्षिण आफ्रिकेने धुळीस मिळवले. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला असता, तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटममध्ये भारताने इतिहास रचला असता. मात्र, एका पराभवामुळे भारताची निराशा झाली.
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. भारतीय (India) संघाने यावेळी फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलर (David Miller) आणि रस्सी व्हॅन डर दुसेन (Rassie Van Der Dussen) या धडाकेबाज फलंदाजांनी भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. दक्षिण आफ्रिका संघाने १९.१ षटकात फक्त ३ विकेट्स गमावत भारताचे २११ धावांचे आव्हान पार केले आणि सामना खिशात घातला.
That's that from the 1st T20I.
South Africa win by 7 wickets and go 1-0 up in the 5 match series.#TeamIndia will look to bounce back in the 2nd T20I.
Scorecard – https://t.co/YOoyTQmu1p #INDvSA @Paytm pic.twitter.com/1raHnQf4rm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
भारतीय संघाने यापूर्वी खेळलेल्या सलग १२ टी२० सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे इतिहास रचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पराभूत केल्याने हे स्वप्न स्वप्नच राहिले.
भारताव्यतिरिक्त रोमानिया आणि अफगाणिस्तान या संघांनीही सलग १२ टी२० सामने जिंकले आहेत. त्यातील रोमानिया या संघाला मागील महिन्यात मिळालेल्या पराभवामुळे तेदेखील १३ सामने जिंकत इतिहास रचण्यात अपयशी ठरले. रोमानियाने २०२०-२१ या कालावधीत सलग १२ टी२० सामने जिंकले होते. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघान २०१८-१९ या कालावधीत सलग १२ टी२० सामने आपल्या नावावर केले होते.
आंतरराष्ट्रीय पुरुष टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारे संघ
१२ वेळा- अफगाणिस्तान (२०१८-१९)
१२ वेळा- भारत (२०२१-२२)*
१२ वेळा- रोमानिया (२०२०-२१)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिलर- रस्सीपुढे भारतीय गोलंदाजांची दैना, दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने काबीज केला पहिला सामना
दिल्लीत तळपली इशान किशनची बॅट, तडाखेबंद फलंदाजीने केली रोहित अन् रैनाच्या विक्रमाची बरोबरी
दात तुटून रक्तबंबाळ झालेलं फलंदाजाचं तोंड, पाहा एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूचा व्हिडिओ