वनडे विश्वचषक 2023 मध्ये शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ समोरासमोर येतील. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होणारा हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा असेल. पाकिस्तान संघ स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल. तर, दक्षिण आफ्रिका विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचेल.
स्पर्धेत आत्तापर्यंत चार विजय व एक पराभव मिळवून दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा रनरेट सर्वात जास्त असल्याने या सामन्यात विजय मिळवून ते भारताला मागे टाकेल पहिल्या स्थानी विराजमान होतील. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान पहिल्या दोन विजयानंतर आपली लय कायम ठेवू शकला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी त्यांच्यावर मात केली. त्यामुळे पराभवांचा चौकार रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
चेन्नईच्या फिरकी गोलंदाजीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेचे पारडे किंचितसे जड आहे. तर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेन. दक्षिण आफ्रिका संघ 1999 नंतर पाकिस्तानला विश्वचषकात पराभूत करू शकलेला नाही. ही परंपरा मोडीत काढण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा प्रयत्न असणार आहे.
या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्जी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद वसिम ज्यू, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
(South Africa vs Pakistan Preview ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या
आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया