पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत महाराष्ट्र मंडळ संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत इलाईट डिव्हिजन गटात प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटात महाराष्ट्र मंडळ संघाने एसेस युनायटेड संघाचा 22-10 असा पराभव केला. महाराष्ट्र मंडळ संघाकडून राजेंद्र देशमुख, कमलेश शहा, संजय सेठी, हेमंत देवरे, अभिषेक चव्हाण, राजेंद्र देशमुख यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात एडीएस महाराष्ट्र मंडळ संघाने एमडब्लूटीए 2 संघावर 24-11 असा विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
महाराष्ट्र मंडळ वि.वि.एसेस युनायटेड 22-10(100अधिक गट: राजेंद्र देशमुख/कमलेश शहा वि.वि.सुनील लुल्ला/बद्री पुनावाला 6-2; 90 अधिक गट: विकास बचलू/विक्रम श्रीमळ पराभूत वि.राहुल सिंग/सचिन झा 2-6; खुला गट: संजय सेठी/हेमंत देवरे वि.वि.पार्थ मोहपात्रा/प्रफुल नागवानी 6-2; खुला गट: अभिषेक चव्हाण/राजेंद्र देशमुख वि.वि.सुनील लुल्ला/सुनील खेमचंदानी 6-0);
एडीएस महाराष्ट्र मंडळ वि.वि.एमडब्लूटीए 2 24-11(100अधिक गट: अर्जुन वाघमारे/परवेश अहमद वि.वि.डॉ.जयंत कुलकर्णी/रोहित जोहान्स 6-0; 90अधिक गट: श्वेतल शहा/राहुल कर्णे वि.वि.अनिरुद्ध अत्रे/धीरज वाल 6-4; खुला गट: देवेंद्र सेठिया/राकेश झडपे वि.वि.राजेंद्र चौधरी/राजेश मंकणी 6-2; खुला गट: संदीप चोरडिया/सचिन डी. वि.वि.रोहित जोहान्स/राजीव खरे 6-4).
महत्त्वाच्या बातम्या –
बाऊन्स टेनिस अकादमी-एमएसएलटीए एआयटीए सुपर सिरिज: सुजय देशमुख, नीरज जोर्वेकर, रोहन बजाज यांचे विजय