पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अंशुल सातव याने तर, मुलींच्या गटात दुर्गा बिराजदार, प्रतिष्ठा सैनी, रितिका मोरे, श्रुती नानजकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच मानांकित खेळाडूंचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत लकी लुझर ठरलेल्या बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या दुर्गा बिराजदार हिने कर्नाटकाच्या अव्वल मानांकित जेएस साई श्रीयाचा 6-4, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. प्रतिष्ठा सैनी हिने दुसऱ्या मानांकित मृण्मयी जोशीचा 6-2, 6-4 असा पराभव करत आगेकूच केली. रितिका मोरे हिने आठव्या मानांकित अधिरा गुप्ताला 6-1, 6-1 असे सहज नमविले. महाराष्ट्राच्या श्रुती नानजकर हिने दिल्लीच्या सातव्या मानांकित आर्शीन सप्पलला 6-2, 6-0 असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलांच्या गटात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या अंशुल सातवने आपला राज्य सहकारी आठव्या मानांकित अनिश रांजळकरचा 1-6, 6-2, 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. काल अव्वल मानांकित सनसनाटी विजय मिळवणाऱ्या ओजस दबसने राघव अमीनचा 6-4, 6-2 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:
ओजस दबस(महा)वि.वि.राघव अमीन(महा)6-4, 6-2;
सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.जय दीक्षित(महा)6-2, 6-2;
अनमोल नागपुरे(महा)[4] वि.वि.दिव्यांक कवितके(महा)6-2, 6-4;
आर्यन कोटस्थाने(महा)[5] वि.वि.स्वराज ढमढेरे(महा)6-3, 6-3;
तनिष्क जाधव(महा)[6]वि.वि.संप्रित शर्मा(छत्तीसगढ)6-3, 6-4;
निशीत रहाणे(महा)[7] वि.वि.अनिकेत चौबे(उत्तरप्रदेश)6-0, 6-1;
अंशुल सातव(महा)वि.वि.अनिश रांजळकर(महा)[8]1-6, 6-2, 6-1
साहिल तांबट(महा)[2] वि.वि.सार्थ बनसोडे(महा)6-4, 6-2;
मुली:
दुर्गा बिराजदार(महा)वि.वि.जेएस साई श्रीया(कर्नाटक)[1] 6-4, 6-1;
प्रतिष्ठा सैनी(महा)वि.वि.मृण्मयी जोशी(महा)[2]6-2, 6-4;
हिया मेहता(तेलंगणा)वि.वि.काव्या देशमुख(महा)4-6, 6-2, 6-2;
प्रिशा शिंदे(महा)वि.वि. सहना कमलाकन्नन(महा)6-0, 6-0;
अस्मि आडकर(महा)[6] वि.वि.आयुशा इंगवले(महा)6-0, 6-0;
रितिका मोरे(महा)वि.वि.अधिरा गुप्ता(महा)[8] 6-1, 6-1;
अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[4]वि.वि.भक्ती ताजने(महा)6-1, 6-4;
श्रुती नानजकर(महा)वि.वि.आर्शीन सप्पल(दिल्ली)[7] 6-2, 6-0;
महत्त्वाच्या बातम्या –
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ संघाची आगेकूच