पहिले सत्र ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत रंगणार स्पर्धा
स्पर्धेत ८२००हुन स्पर्धकांसह ५०० शाळांचा सहभाग
पुणे, दि. १० डिसेंबर २०२२- सर्वांसाठी क्रीडाक्षेत्र खुले असावे, अशा हेतूने व क्रीडाक्षेत्राचा तळागाळापासून प्रचार व प्रसार करण्यासाठी स्पोर्टस फॉर ऑल या भारतातील पहिल्या डिजिटल व मैदानावर काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुण्यात येत्या ११ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेच्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या या पहिल्याच क्रीडास्पर्धेत पुण्यातील ८२००स्पर्धकांसह ५०० शाळांचा सहभाग नोंदवला असून एकूण ३ लाख रुपये पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच प्रशिक्षकांसाठीही आखण्यात आलेल्या खास योजनेनुसार एकूण १२ लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत. एकूण सात दिवस रंगणारी ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, विमाननगर स्केटिंग रिंक, डेक्कन जिमखाना क्लब, टिळक जलतरण तलाव- डेक्कन जिमखाना आणि स्पायसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी अशा पाच ठिकाणी होणार असून त्यात विविध क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.
स्पोर्टस फॉर ऑल संस्थेच्या मुख्य विपणन अधिकारी समेरा खान म्हणाल्या, की स्पोर्टस फॉर ऑलच्या माध्यमातून तळागाळापासून अधिकाधिक बालकांमध्ये क्रीडाक्षेत्राबद्दल रस निर्माण करणे आणि त्यांना क्रीडाक्षेत्रात सहभागाची सधी देणे हे आमचे लक्ष्य आहे. बालकांमधील सुप्त क्रीडागुणांना ओळख मिळावी आणि त्यांना विकासाची संधी मिळावी, हेच स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेचे ध्येय आहे यातील अनेक शाळांमध्ये आमच्या दष्टीशी मिळते वातावरण असून या शाळा दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबरच उत्तम दर्जाच्या क्रीडासुविधांकडे आणि बालकांमध्ये क्रीडागुण विकसित करण्याकडे लक्ष देतात. स्पोर्टस फॉर ऑल स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही आम्हीला असंख्य शाळांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रचंड यशस्वी होण्याचा आम्हाला विश्वास वाटतो.
मुंबई, हैदराबाद आणि डेहराडून येथे ही स्पर्धा २०१५ पासून आयोजित करण्यात येते. या ठिकाणी पार पडलेल्या स्पोट्र्स फॉर ऑल स्पर्धांच्या १० सत्रांमध्ये तीन हजार शाळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बालकांपासून युवकांपर्यंत सर्वांना विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होण्याची संधी देणे आणि त्यासाठी त्यांना उच्च दर्जाच्या क्रीडासुविधा उपलब्ध करून देणे, याकडे स्पोर्टस फॉर ऑल संयोजकांचे खास लक्ष असते. तसेच अधिकाधिक खेळाडूंच्या सहभागासाठीही त्यांचा प्रयत्न असतो. तंत्रज्ञानावर आधारित अशी अत्याधुनिक कीडा व्यवस्थापन यंत्रणा हे स्पोर्टस फॉर ऑल स्पर्धेच्या संयोजकांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळे शालेय स्तरापासूनच आवश्यक आकडेवारी व माहितीच्या आधारे गुणवान खेळाडू शोधून काढणे त्यांना शक्य होते.
तळागाळापासून प्रयत्न करून राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडाक्षेत्रातील आपल्या योगदानाबरोबरच स्पोर्टस फॉर ऑल यांनी राष्ट्रीय क्रीडास्पर्धा, खेलो इंडिया यूथ गेम्स, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा यांमध्येही आपले योगदान दिले आहे. तसंच टोकियो ऑलिम्पिक २०२२, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा २०२२ आणि आशियाई क्रीडास्पर्धा २०२२ यांसाठीही ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकृ भागीदार होते. (Sports for all on the lines of Olympics in Pune from December 11)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीएमडीटीए- केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेत राज दर्डा, परी हेंगले यांना विजेतेपद
लिटन दासचे इशान किशनविषयी मोठे विधान, केएल राहुल म्हणाला…