---Advertisement---

क्रीडा क्षेत्रातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली; विराट, रोहितसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट

---Advertisement---

नवी दिल्ली । भारत देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे आज(३१ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज ५ वाजून ४६ मिनीटांनी याची माहिती दिली. काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपुर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रीया करण्यात आली होती.

१० ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील आर आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व २१ दिवसांच्या लढ्यानंतर त्यांची आज प्राणज्योत मालावली.

त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यात क्रीडाक्षेत्राचाही समावेश आहे. अनेक खेळाडूंनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतरत्न प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना लिहिले आहे की ‘देशाने एक चांगला नेता गमावला आहे. श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.’

https://twitter.com/imVkohli/status/1300422069268611074

तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट केले की ‘माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. त्यांनी अनेक दशके भारताची सेवा केली. माझ्या संवेदना त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबर आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

https://twitter.com/sachin_rt/status/1300433420258926592

याबरोबरच भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ट्विट केले आहे की ‘माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत वाईट वाटले.’

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ट्विटमध्ये लिहिले की ‘प्रणव मुखर्जींच्या आत्म्यास शांती लाभो. देशासाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तींप्रती माझ्या संवेदना आहेत.’

याशिवाय गीता फोगट, विजेंदर सिंग, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा अशा अनेक खेळाडूंनी ट्विटरवरुन प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली आहे.

२०१२ ते २०१७ या काळात प्रणव मुखर्जी देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना २०१९मध्ये देशाचा सर्वाच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

ट्रेंडिंग लेख –

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल

हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---