---Advertisement---

पलटण नेहमीच मनं जिंकते!! मुंबईला धू धू धुणाऱ्या अय्यरप्रती बुमराहची ‘खेळाडूवृत्ती’, कौतुकाचा होतोय वर्षाव

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 8:46 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ३४ वा सामना गुरुवारी (२३ सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर हा मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सलग दुसरा पराभव होता. या सामन्यात एकीकडे प्रसिद्ध कृष्णा आणि कायरोन पोलार्ड यांचे शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले; तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने असे काही कृत्य केले, ज्याचे सोशल मीडियावर गुणगान गायले जात आहे.

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असे म्हटले जाते. बऱ्याचदा मैदानावर या वाक्याचा प्रत्यय येत असतो. अनेकदा खेळाडू विरोधी संघातील खेळाडूला मदत करून चाहत्यांची मने जिंकताना देखील दिसून येत असतात. असेच काहीसे कृत्य मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील केल्याचे पाहायला मिळाले.

विरोधी संघातील फलंदाज व्यंकटेश अय्यरने तुफान फटकेबाजी करत मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करण्याचा पाया रचला. परंतु त्याला जेव्हा मदतीची गरज भासली, त्यावेळी जसप्रीत बुमराह वैर विसरून त्याला मदत करण्यासाठी धावत गेला. जसप्रीत बुमराह हा व्यंकटेश अय्यरच्या शूजची लेस बांधताना दिसून आला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक केले जात आहे.

व्यंकटेश अय्यरने या सामन्यात ५३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचित करत माघारी धाडले.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सलामीवीर फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर ६ बाद १५५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ५३ धावांचे बहुमूल्य योगदान देत, हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

राहुल… नाम तो सुना होगा! त्रिपाठीने मुंबईकरांना दाखवले चांदणे, केली कारकिर्दीतील चौथी सर्वोच्च वैयक्तिक खेळी

MI vs KKR: अय्यर अन् त्रिपाठीचे झंझावाती अर्धशतक, कोलकाताचा मुंबईला ७ विकेट्सने धोबीपछाड

यष्टीरक्षक कार्तिक बनला ‘नवा कॅचमास्टर’, मुंबईच्या धाकड फलंदाजांला झेलबाद करत धोनीवरही ठरला वरचढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---