कोलकाता नाईट रायडर्सने शानदार खेळ करून पुन्हा एकदा आयपीएल २०२१ मध्ये विजयाची नोंद केली आहे. अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकात्याने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून १५५ धावा केल्या. कोलकातासाठी त्यांच्या दोन तरुण फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला आणि मुंबईच्या ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ऍडम मिल्ले, कृणाल पंड्या, राहुल चाहर या अनुभवी गोलंदाजांपैकी एकालाही त्यांनी सोडले नाही.
कोलकाताच्या राहुल त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाच्या विजयासाठी अर्धशतके केली. अय्यरने ५३ धावा केल्या तर त्रिपाठीने ७४ धावा केल्या. ही त्रिपाठीची आयपीएल कारकिर्दीतील चौथी सर्वोधिक वैयक्तिक खेळी ठरली.
आधी व्यंकटेश आणि त्यानंतर त्रिपाठीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने बुमराहच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर लगेचच व्यंकटेश पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने शानदार खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली होती. व्यंकटेश बाद झाल्यानंतरही त्रिपाठीने मोर्चा सांभाळला. त्याने डावाखेर नाबाद राहत ७४ धावांची खेळी खेळली. त्रिपाठीने आपल्या खेळीसाठी ४२ चेंडूंचा सामना केला आणि ८ चौकार आणि ३ षटकार मारले.
यासह त्रिपाठीने आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध चौथी मोठी खेळी नोंदवली आहे. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या ही ९३ आहे. २०१७ मध्ये कोलकाता संघाविरुद्धच त्याने ही खेळी खेळली होती. पुढे २०२० मध्ये त्याने चेन्नई विरुद्ध ८१ धावांची खेळी खेळली होती; तर २०१८ मध्ये त्याने बेंगलोर विरुद्ध नाबाद ८० धावांची खेळी खेळली होती. याशिवाय त्याने २०१७ मध्ये हैद्राबाद विरुद्ध ५९ धावांची खेळी खेळली होती. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील पाचवी सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs KKR: अय्यर अन् त्रिपाठीचे झंझावाती अर्धशतक, कोलकाताचा मुंबईला ७ विकेट्सने धोबीपछाड
नरेनच्या जादुई फिरकीपासून ‘हिटमॅन’ही नाही वाचू शकला, ‘इतक्यांदा’ बाद होत नावे झाला लाजिरवाणा विक्रम
दिस इज हिटमॅन्स वे!! फक्त ३३ धावांच्या छोटेखानी खेळीसह रोहितचा केकेआरविरुद्ध कोणीही न केलेला विक्रम