भारताच्या वरिष्ठ क्रिकेटपटू श्रीसंत सध्या आपल्या पुनरागमनाच्या वाटेवर आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी हंगाम असतो केरळ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतोय. हंगामातील पहिल्या सामन्यात तो सहभागी झाला होता. मात्र, दुसर्या सामन्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो आता पुढील काही दिवस मैदानात उतरु शकणार नाही. त्याने नुकताच आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये तो विश्रांती करताना दिसत आहे.
— Sreesanth (@sreesanth36) March 1, 2022
सरावात झाली होती दुखापत
तब्बल ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा श्रीसंत हंगामातील पहिला सामना खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. त्याने इंस्टाग्रामवरून आपल्या दुखापतीची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्याने इंस्टाग्राम व ट्विटर पोस्ट केली आहे ज्यामध्ये मित्र तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.
सध्या ३९ वर्षाचा असलेला श्रीसंत २०१३ नंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहभागी होत आहे. २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याच्या कारणाने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, चौकशीअंती तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. २०१९ मध्ये त्याच्या वरील बंदी उठवण्यात आली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्याने टी२० व लिस्ट ए क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तसेच नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा लिलावासाठी त्याने नाव नोंदणी केली होती. ५० लाख बेस प्राईसमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नाही.
संमिश्र राहिले रणजी पुनरागमन
केरळ संघासाठी खेळताना त्याने मेघालय विरुद्ध रणजी पुनरागमन केले. त्याने या सामन्यात दोन बळी मिळवले. तर फलंदाजी करताना पहिल्या डावात १९ धावांचे योगदान दिले. श्रीसंतने राष्ट्रीय संघासाठी अखेरचा सामना २०११ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळला होता. तेव्हापासून तो पुन्हा निळ्या जर्सीत खेळताना दिसला नाही.
महत्वाच्या बातम्या-