इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात रविवारी (8 नोव्हेंबर) दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. हा सामना अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रात्री 7:30 वाजता होईल.या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात मुंबईचा सामना करेल.
या मैदानावर झालेल्या मागील सामन्यात दव पाहायला मिळाले नाही. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला काय निर्णय घ्यावा याविषयी शंकाच असेल.
हंगामातील दोन्ही सामन्यात दिल्लीचा झाला पराभव
मोठी गोष्ट म्हणजे या हंगामा झालेल्या दोन्ही सामन्यात दिल्लीचा हैदराबादकडून पराभव झाला होता. गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे त्याच्याकडे सध्या पर्पल कॅप नाही. दिल्लीची आणखी एक समस्या म्हणजे रबाडा आणि एन्रीच नॉर्किए यासारख्या गोलंदाजांव्यतिरिक्त या संघात इतर पर्याय नाही. विशेषत: या गोलंदाजांच्या दर्जाचा एकही भारतीय गोलंदाज या संघात नाही.
पृथ्वी शॉ, डॅनियल सॅम्स या सामन्याला मुकणार?
दुसरीकडे दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ खराब फॉर्ममुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज खेळण्याची शक्यता आहे.
सलग पाचवा विजय मिळवण्यास हैदराबाद तयार
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ विजय रथावर असून सलग पाचवा विजय मिळवण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत हैदराबादला संघात कोणतेही बदल करायला आवडणार नाही.
काय सांगतो इतिहास?
दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 17 सामने झाले आहेत.यामध्ये हैदराबादने 11 सामन्यात विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य अंतिम ११ जणांचे संघ:
दिल्ली कॅपिटल्स –
शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए.
सनरायझर्स हैदराबाद-
डेविड वॉर्नर, श्रीवत्स गोस्वामी/वृद्धिमान साहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, रशिद खान, शहबाज नदीम, टी नटराजन, संदीप शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माझे कोणी चांगले फोटोच काढत नाही’, विराट-अनुष्काचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची तक्रार
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख –
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?