---Advertisement---

सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…

On: मंगळवार, मे 7, 2019 3:54 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 मधील प्ले ऑफच्या फेरीला आजपासून(7 मे) सुरुवात होणार आहे. या प्लेऑफ फेरीसाठी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे संघ पात्र ठरले आहेत.

प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी आधीच स्थान निश्चित केले होते. मात्र चौथ्या जागेसाठी चूरस सुरु होती. तसेच सनरायझर्स हैद्राबाद शनिवारी(4 मे) त्यांचा आयपीएल 2019च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पराभूत झाल्याने ही चूरस आणखी वाढली होती.

या पराभवामुळे हैद्राबादला प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी रविवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार होते.

अखेर मुंबईने कोलकता विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला आणि सनरायझर्स हैद्राबादसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले गेले. या सामन्यानंतर हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्विटरवर मजेशीर ट्विट करत मुंबई इंडियन्सचे आभार मानले आहेत.

आयपीएलच्या साखळी फेरीनंतर सनरायझर्स हैद्राबाद, कोलकता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांचे गुण सारखेच होते. परंतू हैद्राबादने नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफमधील स्थान पक्के कले.

त्याचबरोबर सनरायझर्स हैद्राबाद हा साखळी फेरीत केवळ सहा सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरलेला आयपीएल इतिहासातील पहिलाच संघ ठरला.

आता प्लेऑफमध्ये हैद्राबादचा सामना 8 मे ला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचे आयपीएल 2019 मधील आव्हान संपूष्टात येणार आहे.

मुबंई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यानंतर आलेल्या चाहत्यांच्या काही मजेशीर प्रतिक्रिया –

https://twitter.com/Prudhvi34510373/status/1125095423587184641

https://twitter.com/SuShaNtH1314/status/1125097135253274624

https://twitter.com/NaveenMayaa/status/1125095110201360384

महत्त्वाच्या बातम्या –

उमेश यादवच्या नो बॉल प्रकरणानंतर अंपायरने रागात तोडला दरवाजा

२०१९ विश्वचषकासाठी ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलवर नवीन जबाबदारी

रोहित शर्माने अनोखे सेलिब्रेशन करत अर्धशतक केले लेकीला समर्पित, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment