मेगा लिलावापूर्वी सर्व 10 संघांनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (IPL) च्या 18 व्या हंगामासाठी त्यांच्या रिटेंन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. पंजाब किंग्ज आणि आरसीबी वगळता उर्वरित 8 संघांनी खेळाडूंना रिटेन करण्यात खूप पैसा खर्च केला. पंजाब किंग्जने केवळ 2 खेळाडूंना कायम ठेवले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 खेळाडूंना कायम ठेवले. पंजाबने शशांक सिंग (5.50 कोटी) आणि प्रभसिमरन सिंग (रु. 4 कोटी) तर आरसीबीने विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांना त्यांच्या संघात कायम ठेवले.
विराट कोहलीला रिटेन करण्यासाठी आरसीबीने सर्वाधिक पैसा खर्च केला. विराट कोहलीला संघाने 21 कोटी रुपये देऊन कायम ठेवले. आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये तर यश दयालला अनकॅप्ड खेळाडू म्हणून 5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. विराट कोहली 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. गेल्या 17 वर्षांपासून तो एका संघाकडून म्हणजेच आरसीबीकडून खेळत आहे. यादम्यान त्याच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे. पहिल्या तीन हंगामात कोहलीचा पगार 12 लाख रुपये होता. त्यानंतर त्याने मोठी झेप घेतली आणि 2011 मध्ये त्याचा पगार थेट 8.28 कोटी रुपयांवर पोहोचला. 2015 पासून कोहलीला 15 कोटी रुपये मिळत होते. पण यावेळी त्याने 20 कोटींचा आकडा पार करून नवा इतिहास रचला. आयपीएलमध्ये 20 कोटींहून अधिक मानधन घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीचा पगार
2008 – 12 लाख (U19 मसुदा)
2011 – 8.28 कोटी
2014 – 12.5 कोटी
2018 – 17 कोटी
2022 – 15 कोटी
2025 – 21 कोटी*
विराट कोहलीने आयपीएलमध्ये 21 कोटींच्या पगाराचा नवा विक्रम केला असला तरी एक खेळाडू असा आहे की ज्याला किंग कोहलीपेक्षा जास्त पैसे रिटेनशनमध्ये दिले गेले. हेनरिक क्लासेन असे या खेळाडूचे नाव असून, त्याला सनरायझर्स हैदराबादने 23 कोटी रुपयांना रिटेन केले. क्लासेनच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. याआधी सनरायझर्स हैदराबादने क्लासेनला केवळ 5.25 कोटी रुपये दिले होते. परंतु यावेळी त्याला 23 कोटी रुपये मिळाले आहेत. अशाप्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्क हा 24.75 कोटी रुपयांसह आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आहे. क्लासेन व्यतिरिक्त एसआरएचने कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनाही कायम ठेवले आहे.
हेही वाचा-
रोहित की हार्दिक, आयपीएल 2025 मध्ये मुंबईचा कर्णधार कोण असेल? फ्रँचायझीचा मोठा खुलासा
ट्रॉफी जिंकूनही श्रेयस अय्यरला नाही मिळाला भाव, आयपीएल संघांनी ‘या’ 5 कर्णधारांना केले रिलीज
‘आम्हाला जिंकणाऱ्या मानसिकतेचे खेळाडू हवे होते’, संजीव गोएंकांनी अप्रत्यक्षपणे राहुलला सुनावलं?