---Advertisement---

Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 3:17 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामात कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 5 सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे. संघाच्या खराब कामगिरीसाठी फलंदाजांची झालेली खराब कामगिरी जबाबदार आहेत. सलामीवीर फाफ डुप्लेसिस व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने खास कामगिरी केलेली नाही. यातच धोनीने 8 सामन्यात 33.25 च्या सरासरीने अवघ्या 133 धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीने त्याने सर्वांनाच निराश केले आहे. मात्र धोनीने मंगळवारी (13 ऑक्टोबर) हैदराबादविरुद्ध मारलेल्या षटकाराचीच बरीच चर्चा होत आहे.

धोनी या सामन्यात 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. चेन्नईच्या डावाच्या 19 व्या षटकात हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन गोलंदाजी करायला आला. षटकाच्या 5 व्या चेंडूवर धोनीने लांबलचक षटकार खेचला. हा षटकार 102 मीटर लांब होता.

https://twitter.com/JaveedH16/status/1316063208818401280?s=20

चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाने या हंगामात मारलेला हा सर्वात लांब षटकार होता. त्याचबरोबर या हंगामात मारलेल्या लांबलचक षटकारांच्या यादीत हा षटकार चौथ्या क्रमांकावर आहे.

या षटकारामुळे खराब फॉर्ममध्ये असलेल्या धोनीचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल. आणि पुढील सामन्यांमध्ये धोनी उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अशा त्याच्या चाहत्यांना असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर

फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’

IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---