SRH vs LSG: आयपीएल 2025चा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 5 विकेट्सने जिंकून, लखनऊ संघाने हंगामात विजयाचे खातेही उघडले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या, ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेडने 47 धावा अनिकेत वर्माने 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
या सामन्यात, लखनऊ संघाकडून शार्दुल ठाकूरची अद्भुत गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याने प्रथम पाॅवरप्लेमध्ये अचूक गोलंदाजी करत अभिषेक शर्माला 6 धावांवर बाद केले. यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ईशान किशनही त्याचा बळी ठरला. डेथ ओव्हर्समध्ये देखील त्याने छाप सोडली ज्यात त्याने अभिनव मनोहर व मोहम्मद शमीला बाद केले, आशाप्रकारे ठाकूर 4 षटकात 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, त्याच्या या शानदार कामगगिरीच्या जोरावर लखनऊने हैदराबाद संघाला 200 धावसंख्येच्या आत रोखले.
SHARDUL STRIKES! ????
— Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2025
The dangerous #AbhishekSharma falls into the trap as he gets caught at fine leg off #ShardulThakur’s clever delivery!
Watch LIVE action: https://t.co/f9h0ie1eiG #IPLonJioStar ???? #SRHvLSG | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/hx4H3wO2EN
Doing what he does best ???? ????
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
Shardul Thakur produces a special bowling spell to help #LSG clinch a BIG win and takes home the Player of the Match award ????
Updates ▶ https://t.co/X6vyVEvxwz#TATAIPL | #SRHvLSG | @LucknowIPL | @imShard pic.twitter.com/VDtFcq5zlp
लक्ष्याचा पाठलाग करताना, लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरन (70) आणि मिशेल मार्श (52) यांच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीच्या जोरावर सामना एकतर्फी जिंकण्यात यशस्वी झाला.






