---Advertisement---

थ्री डायमेंशन खेळाडू ठरला फ्लॉप; सोशल मीडियावर थ्री डी मिम्स होतायेत व्हायरल

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 11:33 AM
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामातील पहिल्या सामन्याची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समधील सामान्याने झाली. यात अंबाती रायडूने केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळविला. त्यानंतर काल झालेल्या तिसर्‍या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (एसआरएच) अष्टपैलू विजय शंकर फ्लॉप ठरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विजय शंकर गोल्डन डकवर बाद झाला होता आणि त्यानंतर ‘थ्री डी’ मेम्स ट्विटरवर व्हायरल होऊ लागले. विजय शंकर गोलंदाजीतही महागडा ठरला आणि 1.2 षटकांत 14 धावा खर्च केल्या.

वास्तविक, गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये रायडूच्या जागी विजय शंकरची नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय निवड समितीने सांगितले की, “विजयला थ्री डायमेंशन (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) यांच्यामुळे रायडूच्या तुलनेत अधिक प्राधान्य मिळाले.” यानंतर रायडूचे एक ट्विट व्हायरल झाले.

संघ निवडीनंतर रायडूने ट्विटरवर लिहिले होते की, विश्वचषक पाहण्यासाठी त्याने ‘थ्री डी’ चष्म्याची ऑर्डर दिली आहे. हैद्राबादसाठी पहिल्या सामन्यात विजय शंकरच्या फ्लॉप शोनंतर रायडूच्या ‘थ्री डी’ ट्विटसंबंधी खूप सारे मिम्स शेअर करण्यात आले.

सीएसकेकडून रायडूने पहिल्या सामन्यात 71 धावा केल्या होत्या आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. एका युजरने लिहिले, “रायडू आरसीबी आणि हैद्राबाद सामन्यात विजय शंकरचे प्रदर्शन थ्रीडी ग्लासेससह पाहत आहे.” विश्वचषकातही विजय शंकर काही खास कामगिरी करू शकला नाहीत. रायडूला संघात न निवडल्यामुळे निवड समितीला टीकेचा सामना करावा लागला.

सोमवारी झालेल्या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकला आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कल आणि एबी डिविलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 5 बाद 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैद्राबाद संघ 19.4 षटकांत 153 धावांवर सर्वबाद झाला. युझवेंद्र चहलने 3, तर शिवम दुबे आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सोबतच डेल स्टेनने १ विकेट घेतली. या विजयासह आरसीबी संघ +0.500 नेट रनरेट आणि 2 गुणांसह पॉईंट टेबलच्या शीर्षस्थानी पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

-वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…

-पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---