---Advertisement---

कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला करू शकता बाद; या गोलंदाजाने दाखवून दिले

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 10:45 AM
---Advertisement---

21 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रातील तिसर्‍या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला (एसआरएच) 10 धावांनी पराभूत केले. एकवेळ असे वाटत होते की हैद्राबाद हा सामना सहज जिंकेल. त्यांची धावसंख्या 15.2 षटकांत 3 बाद 121 अशी होती, त्यानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीने संपूर्ण सामना उलथवून टाकला. चहलने 4 षटकांत केवळ 18 धावा देऊन तीन गडी बाद केले आणि सामनावीर म्हणूनही त्याला निवडले गेले.

या सामन्यात चहलची गोलंदाजी हा निर्णायक बिंदू होता, असे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. सामन्यात विजय मिळविल्यानंतर विराट म्हणाला, “आम्ही संयम ठेवला, चहल आला आणि त्याने सामना पलटविला. त्याने दाखवून दिले की तुमच्याकडे कौशल्य असेल, तर तुम्ही कोणालाही बाद करू शकता. ज्या पद्धतीने तो गोलंदाजीला आला आणि त्याने आक्रमण केले. त्यामुळेच त्याने सामन्याची स्थिती बदलवून टाकली. आम्ही चांगली सुरुवात केली. देवदत्त पडिक्कल खूपच चांगला फलंदाज आहे आणि सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचनेही चांगली सुरुवात केली.”

पुढे बोलतांना तो म्हणाला, “शेवटच्या तीन षटकांत अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आम्हाला 163 धावा काढण्यास मदत मिळाली. आम्ही गोलंदाजी विभागात नकारात्मकता येऊ दिली नाही आणि शिवम दुबेने फेकलेली तीन षटके चांगली होती. हे बघून बरे वाटले.”

हैद्राबादने नाणेफेक जिंकला आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कल आणि एबी डिविलियर्सच्या अर्धशतकांमुळे आरसीबीने 20 षटकांत पाच बाद 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात एसआरएच संघ 19.5 षटकांत 133 धावांवर बाद झाला. चहलने तीन तर शिवम दुबे आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या विजयासह आरसीबी संघ गुणतालिकेत +0.500 रनरेट आणि दोन गुणांसह शीर्षस्थानी पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

-वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…

-पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---