ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी२० मालिका गमावल्यानंतर ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेच्या संघाने धमाकेदार पुनरागमन केले आहे. पल्लेकेले येथे झालेला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा वनडे सामना यजमानांनी २६ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. यापूर्वीचा पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने जिंकला होता.
या सामन्यात (Sri Lanka vs Australia) प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४७.४ षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर २२० धावा केल्या. त्यानंतर पाऊसाच्या सरी कोसळू लागल्याने पंचांनी २२० धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियापुढे ४३ षटकांमध्ये २१६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८९ धावांवर गुंडाळला गेला. चमिका करुणारत्नेला (Chamika Karunaratne) त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मामित करण्यात आले.
श्रीलंकेच्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेविड वॉर्नरने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलनेही ३० धावांची खेळी केली. तसेच स्टिव्ह स्मिथ (२८ धावा), ट्रॅविस हेड (२३ धावा) यांनीही योगदान दिले. परंतु इतर फलंदाजांना २० धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाचा संघ ३७.१ षटकातच सर्वबाद झाला.
Sri Lanka tie the series 1-1 after an incredible fightback to win the second #SLvAUS ODI 👏 pic.twitter.com/bHTqhWIBiZ
— ICC (@ICC) June 17, 2022
या डावात श्रीलंकेकडून चामिका करुणारत्नेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेत दुश्मंता चमीरा, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेल्लालेगे यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी श्रीलंकेच्याही कोणत्या फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. श्रीलंकेकडून यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने सर्वाधिक ३६ धावा जोडल्या. धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दसुन शनाका यांनीही प्रत्येकी ३४ धावांचे योगदान दिले. या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले होते. पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू कुह्नेमन यांनीही २ फलंदाजांना तंबूत धाडले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वीच आयर्लंडच्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर
आठवणीतील सामना: २३ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ
‘मला धोनीची जागा घ्यायची आहे!’, रियान परागच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ