श्रीलंकेचे क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी 2011च्या विश्वचषक अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केल्यानंतर श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने तत्कालीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात श्रीलंकेचा माजी खेळाडू अरविंद डिसिल्वा आणि उपुल थरंगा यांची चौकशी केल्यानंतर त्यावेळीचा श्रीलंकेचा कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराला देखील चौकशीसाठी बोलावले होते.
कुमार संघकाराची पाच तास चौकशी केली गेली. श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या विरुद्ध विरोधात प्रदर्शने सुरू केली आहेत. श्रीलंका पोलिसांच्याद्वारे सुरू असलेल्या या चौकशीला ‘समागी जन बावालेगया’ या संघटनेने आक्षेप नोंदवला. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या बाहेर तीव्र निदर्शने केली.
सोबतच, खेळाडूंच्या चौकशीच्या या घटनेला राजकीय रंग चढणे सुरू झाले आहे. युनायटेड नॅशनल पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार सजीत प्रेमदासा यांनीदेखील या चौकशीचा विरोध केला आहे.
२०११च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर संगकाराने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. संगकारापाठोपाठ अंतिम सामन्यात शतक झळकावलेल्या माहेला जयवर्धनेची देखील चौकशी केली जाऊ शकते.
कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी याआधीच अशा प्रकारचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यामते,” आगामी निवडणुकांत विजय मिळवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे यामधून काहीही सत्य बाहेर येणार नाही. आम्ही तो विश्वचषक पूर्ण इमानदारीने आणि एकजुटीने खेळलो होतो.”
क्रीडामंत्री अलुथगमगे यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप करताना असा दावा केला होता की, ” श्रीलंका संघाने विश्वचषकाची ट्रॉफी भारताला बक्षीस दिली होती. मला किंवा बोर्डाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला न सांगता, सल्लामसलत न करता संघात बदल केला होता. कमी अनुभव असलेल्या चार खेळाडूंना आयत्यावेळी संघात स्थान कसे दिले?”
भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभूत करत २८ वर्षानंतर विश्वविजेतेपद मिळवले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
कोहली व गांगुलीच्या कसोटीत जर मॅच झाली तर हा संघ जिंकणार, कारणही आहे तसेच
इरफान पठाणला व्हायचंय दहशतवादी हफिज सईद, पहा कोण म्हणतंय हे
७व्या वर्षी घेतली धोनीकडून प्रेरणा, आज आहे दिग्गज क्रिकेटर व विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष