भारतीय संघाचे २ माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांची तुलना नेहमीच केली जाते. हे दोन्ही कर्णधारांची गणना महान कर्णधारांमध्ये करण्यात येते. तसेच क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज या कर्णधारांवर चर्चा करत असतात. अशाच प्रकारे आता भारताचे माजी निवड समिती प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत यांनी धोनी हा गांगुलीच्या उलट कर्णधार असल्याचे सांगितले आहे.
श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांच्या मते गांगुलीने (Sourav Ganguly) संघात आक्रमकता आणली. तर धोनीने (MS Dhoni) भारतीय संघाला संयमी आणि शांतताप्रिय बनवले.
श्रीकांत यांनी धोनी आणि गांगुलीच्या नेतृत्वाबद्दल (Captainship) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा धोनी २००७मध्ये टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार होता, तेव्हा त्याने भारतीय संघाला खूप चांगल्याप्रकारे सांभाळले. तसेच त्या विश्वचषकात मिळालेल्या विजयाने त्याचा आत्मविश्वासदेखील वाढविला होता.”
“धोनी नेहमीच संयमी आणि शांत स्वभावाचा असतो. त्याने खेळाडूंचा उत्साह वाढविला. जी आक्रमकता गांगुली भारतीय संघात घेऊन आला होता, याच्या उलट धोनी होता,” असेही श्रीकांत यावेळी म्हणाले. MS Dhoni was totally opposite compare to Sourav Ganguly
श्रीकांत पुढे म्हणाले की, “जेव्हा अनिल कुंबळे (Anil Kumble) कसोटी कर्णधार होता, त्यावेळी धोनीला गोष्टी शिकण्यासाठी खूप चांगली संंधी मिळाली. कुंबळेने धोनीला आवश्यक असलेला अनुभव दिला होता. धोनीने खेळाडूंवर खूप विश्वास दाखविला आहे.”
“ज्यावेळी धोनीसारखा कोणताही खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवितो, तेव्हा भारतीय क्रिकेटची क्षमता बदलते. रांचीचा हा खेळाडू मास्टर स्ट्रोक खेळत असताना, एक झोनच्या निवडकर्त्यांनी त्याच्यामध्ये खास काहीतरी पाहिले. जरी त्याने आपल्या पहिल्या २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती. तसेच त्यावेळी लोकांनी त्याला चूकीचे म्हटले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या १४८ धावांच्या खेळीने त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढविला होता,” असेही श्रीकांत पुढे म्हणाले.
धोनीने कर्णधार म्हणून भारतीय संघाला २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३मध्ये चँपियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. असा कारनामा करणारा धोनी जगातील एकमेक कर्णधार आहे. आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला आयसीसीच्या तिन्ही ट्राॅफींवर नाव कोरता आलेले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-१७ वर्षांपुर्वी इरफानला पाकिस्तानचा तो खेळाडू असं काही वाईट बोलला होता की आजही…
-आपण ज्या वयात बारावीत शिकतं होतो त्या वयात ते खेळले होते ५० वनडे
-…म्हणून धोनी आहे विराट-सचिनला सरस, कारकिर्दीच्या सुरुवातीला या कारणाने ठरला हिरो