श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमधील वार्षिक कराराबाबतचा वाद सध्या सुटताना दिसत नाही. आधी इंग्लंड दौर्यावर जाण्यास नकार दिल्यानंतर आता संघातील खेळाडूंनी इंग्लंडला जाण्याची सहमती दर्शविली आहे. मात्र, या दौर्यावर जाण्याचा अर्थ असा नाही की, खेळाडूंनी कराराला सहमती दर्शविली आहे. खेळाडू कोणत्याही कराराविना इंग्लंडला जातील.
या अटीवर खेळाडू जाणार इंग्लंडला
श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात सुरू असलेला वार्षिक कराराचा वाद अंशतः शमला आहे. इंग्लंड दौर्यानंतर होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करू, असे बोर्ड आणि खेळाडू यांच्यात एकमत झाले आहे. सध्या खेळाडू करारास संमती देणार नाहीत आणि त्याशिवाय इंग्लंडचा दौरा करतील. श्रीलंका क्रिकेट संघातील खेळाडू नव्या वार्षिक करारामुळे नाराज आहेत. त्यांनी बोर्डाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंनी या कराराबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर अनेक खेळाडूंनी एक प्रकारे बंड केले.
देशासाठी खेळणार श्रीलंकन क्रिकेटपटू
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृतानुसार, कराराच्या पारदर्शकतेबाबत खेळाडूंना आक्षेप आहे. याबाबत विचार करण्याची विनंती त्यांनी केली. सध्या इंग्लंड दौर्यावर जाणाऱ्या खेळाडूंनी एका ऐच्छिक घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, त्यामध्ये खेळाडूंच्या मोबदल्याबद्दल काहीही नमूद केले नाही. सर्व खेळाडू देशप्रेम आणि देशासाठी हा दौरा करणार आहेत. श्रीलंकेचा संघ या गुरुवारी म्हणजेच १० जून रोजी इंग्लंड दौर्यावर रवाना होईल. येथे संघाला तीन टी२० आणि त्यानंतर तीन वनडे सामने खेळयचे आहे. या दौर्याला २३ जूनपासून सुरूवात होईल.
इंग्लंड दौऱ्यावर जाणारा श्रीलंका संघ-
कुसल परेरा (कर्णधार), कुसल मेंडीस, दनुष्का गुणतिलका, अविष्का फर्नांडो, पथम निसंका, निरोशन डिकवेला, धनंजय डी सिल्वा, ओशाडा फर्नांडो, चरिथ असालंका, दसुन शनाका, वनिंदू हसरंगा, रमेश मेंडीस, चमिका करूणारत्ने, धनंजया लक्षन, ईशान जयरत्ने, दुश्मंता चमिरा, इसुरू उदाना, असिथा फर्नांडो, नुवान प्रदीप, शिरन फर्नांडो, लक्षन संदकन, अकीला धनंजया व प्रविण जयविक्रमे.
महत्वाच्या बातम्या:
या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक
इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी