जगभरात असे अनेक क्रीडापटू आहेत, जे प्रचंड लोकप्रिय आहेत. यात ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, सचिन तेंडुलकर, रॉजर फेडरर अशा अनेकांची नावे घेता येतील. या क्रीडापटूंना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते. पण या बाबतीत रोनाल्डोने जगातील सर्वच क्रीडापटूंना मागे टाकले आहे.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सोशल मीडियावर ५०० मिलियन (५ कोटी) फॉलोवर्स असणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला सोशल मीडियावर एवढे फॉलोवर्स नाहीत.
रोनाल्डोला सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. त्याला तब्बल २६१ मिलियन (२ कोटी ६१ लाखांपेक्षा अधिक) फॉलोवर्स इंस्टाग्रामवर आहेत. तसेच तो ट्विटरवर लवकरत १०० मिलियन फॉलोवर्स पूर्ण करु शकतो. त्याचे सध्या ९१ मिलियन (९१ लाखांपेक्षा अधिक) फॉलोवर्स ट्विटरवर आहेत.
त्याचबरोबर फेसबुकवर या आघाडीच्या फुटबॉलपटूच्या पेजला तब्बल १२५ मिलियन (१ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक) फॉलोवर्स आहेत.
रोनाल्डो हा बऱ्यापैकी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे त्याला यातून मोठी कमाईदेखील होते.
हे खेळाडू रोनाल्डोच्या मागे
इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोच्या पाठोपाठ डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार द रॉक असून त्याला तब्बव २१७ मिलियन फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे रोनाल्डो आणि द रॉक हे दोनच खेळाडू असे आहेत, ज्यांना २०० मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. मेस्सीला १८३ मिलियन तर नेमारला १४६ मिलियन फॉलोवर्स आहेत.
फेसबुकचा विचार करायचा झाल्यास रोनाल्डो त्यावरही सर्वाधिक फॉलोवर्स लाभलेला खेळाडू आहे. तसेच ट्विटरवरही तो सर्वाधिक फॉलोवर्स असलेला खेळाडू आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्यांच्या यादीत पहिल्या २० मध्ये रोनाल्डो हा एकमेव खेळाडू आहे.
सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू –
काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने युवेंटसकडून इटालियन सुपर कपच्या अंतिम सामन्यात ६४ व्या मिनिटाला गोल करत एक मोठा विश्वविक्रम केला होता. रोनाल्डोचा हा त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीतील ७६० वा गोल होता. त्यामुळे तो व्यावसायिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला होता.
याआधी हा विक्रम ऑस्ट्रो-झेक जोसेफ बीकन यांच्या नावावर होता. त्यांनी ७५९ गोल केले होते. त्यापाठोपाठ या यादीत ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यानावावर अधिकृत ७५७ गोल आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण
प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, ‘हे’ आहे कारण