पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईजरवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवम कदम व दक्ष अगरवाल, कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकर यांनी, तर मुलींच्या गटात तेलंगणाच्या चहाना बुधभट्टी, अभया वेमुरी या खेळाडूंनी पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या व सोळाव्या मानांकित शिवम कदमने गुजरातच्या अव्वल मानांकित विशेष पटेलचा 3-6, 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकाल नोंदविला.
अकराव्या मानांकित कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकरने पश्चिम बंगालच्या सहाव्या मानांकित अरुणवा मजुमदारचा 7-5, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. बाराव्या मानांकित दक्ष अगरवालने सातव्या मानांकित आदित्य राठीचा 2-6, 6-1, 6-4असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुसऱ्या फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात तेलंगणाच्या बिगरमानांकीत अभया वेमुरीने तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या रिया वाशीमकरचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
तेलंगणाच्या चहाना बुधभट्टीने महाराष्ट्राच्या नवव्या मानांकित ख़ुशी शर्माचा 6-3, 4-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या राधिका महाजनने तामिळनाडूच्या लक्ष्मी अरुणकुमारचा 6-1, 6-3असा तर, सोळाव्या मानांकित हर्षिता बांगेराने समीक्षा श्रॉफचा 7-5, 6-2असा पराभव करून आगेकूच केली.
दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने कर्नाटकाच्या कनिस्का श्रीनाथचे आव्हान 6-2, 6-4असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
14 वर्षाखालील मुली: दुसरी फेरी: राधिका महाजन (महा) (1) वि.वि. लक्ष्मी अरुणकुमार(तामिळनाडू)6-1, 6-3; हर्षिता बांगेरा (महा)(16) वि.वि. समीक्षा श्रॉफ(महा)7-5, 6-2; अपूर्वा वेमुरी(तेलंगणा)(12)वि.वि.सायना देशपांडे(महा)6-1, 6-4; वेदा प्रापुर्ना(तेलंगणा)(8)वि.वि.ईरा शहा(महा)6-4, 3-6, 6-2;
भूमिका त्रिपाठी(4)वि.वि.कायराशेट्टी(महा)6-4, 6-4; अमीशी शुक्ला(मध्यप्रदेश)(14)वि.वि.विद्युल मणिकांती(कर्नाटक)5-7, 6-0, 6-3; चहाना बुधभट्टी(तेलंगणा)वि.वि.ख़ुशी शर्मा(महा)(9)6-3, 4-6, 6-3; परी सिंग(महा)(7)वि.वि.सुहानी सभरवाल(महा)6-4, 6-1; हतवी चौधरी(गुजरात)(5)वि.वि.हर्लीन धांडा(पंजाब)6-0, 6-3; मधुरिमा सावंत(महा)(16)वि.वि.सोनल पाटील(महा)6-2, 6-2; अभया वेमुरी(तेलंगणा)वि.वि.रिया वाशीमकर(महा)(3)6-3, 6-2; कशिश बोटे(महा)(10)वि.वि.सारा गजभीये(महा)6-3, 6-4; वैष्णवी आडकर(महा)(2)वि.वि.कनिस्का श्रीनाथ(कर्नाटक)6-2, 6-4;
14 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी: शिवम कदम(महा)(16)वि.वि.विशेष पटेल(गुजरात)(1)3-6, 6-3, 6-4; रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)वि.वि.अरुणवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(6) 7-5, 6-1; आयुष भट(कर्नाटक)(3)वि.वि.अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)(14)6-3, 6-3; दक्ष अगरवाल(महा)(12)वि.वि.आदित्य राठी(हरियाणा)(7)2-6, 6-1, 6-4; मोनील लोटलीकर(कर्नाटक)(10)वि.वि.अर्जुन चॅटर्जी(महा)6-3, 6-0.