कालपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा ऍशेस कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(5 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राअखेर पहिल्या डावात 5 बाद 245 धावा केल्या आहेत.
या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. त्याने आज पहिल्या सत्राअखेरपर्यंत 11 चौकारांसह 163 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या आहेत. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
त्याने या शतकी खेळीबरोबरच केलेले हे खास विक्रम –
#सर्वात जलद 26 वे कसोटी शतक करणारे क्रिकेटपटू –
69 डाव – डॉन ब्रॅडमन
121 डाव – स्टिव्ह स्मिथ
136 डाव – सचिन तेंडूलकर
#इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारे क्रिकेटपटू –
19 शतके – डॉन ब्रॅडमन
11 शतके – स्टिव्ह स्मिथ
10 शतके – गॅरी सोबर्स
10 शतके – स्टिव्ह वॉ
9 शतके – ग्रेग चॅपेल
#एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
19 शतके – डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
13 शतके – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडीज
12 शतके – जॅक हॉब्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया
11 शतके – स्टिव्ह स्मिथ विरुद्ध इंग्लंड
11 शतके – सचिन तेंडूलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
#ऍशेसमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
19 शतके – डॉन ब्रॅडमन
12 शतके – जॅक हॉब्स
11 शतके – स्टिव्ह स्मिथ
10 शतके – स्टिव्ह वॉ
#एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
5 वेळा – डॉन ब्रॅडमन
5 वेळा – गॅरी सोबर्स
4 वेळा – जॅक कॅलिस
4 वेळा – स्टिव्ह स्मिथ
26th Test hundred for Steve Smith – what a player!
FOLLOW #Ashes live 👇https://t.co/zrb0K55IBc pic.twitter.com/oF91qkVxgC
— ICC (@ICC) September 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक
–अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!
–जेव्हा स्टिव्ह स्मिथ क्रिकेटच्या चेंडूवरच नाही तर बीच बॉलवरही मारतो चौकार, पहा व्हिडिओ