ऑस्ट्रेलियन संघ येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्हीही मालिका आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने सराव मालिका असणार आहेत. टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. मात्ऑरस्ट्रेलियन संघातील प्रमुख खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. तर या संघात असा एक खेळाडू आहे, ज्याने दुखापतीमुळे या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज यांच्यात ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज, स्टीव्ह स्मिथने या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. त्याला गेल्या २ -३ वर्षापासून कोपराच्या दुखापतीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. या दुखापतीमुळे त्याच्या टी२० विश्वचषक आणि ॲशेस मालिका खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Steve Smith could be ruled out of T20 world cup and ashes series due to elbow injury)
आयपीएलमध्ये होऊ लागला होता त्रास
स्टीव्ह स्मिथला कोपराच्या दुखापतीचा त्रास यावर्षी आयपीएल स्पर्धा झाली तेव्हापासून सुरू झाला आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ६ सामने खेळले होते. असे म्हटले जात आहे की, आयपीएल स्पर्धेत खेळल्यानंतर त्याची दुखापत आणखी वाढली आहे.
टी-२० विश्वचषक आणि ॲशेस मालिका खेळण्यावर प्रश्नचिन्ह
आता स्टीव्ह स्मिथ टी२० विश्वचषक स्पर्धा आणि ॲशेस मालिका खेळणार की नाही, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दोन्ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे फिट होऊन जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवडकर्ता ट्रेवर होंस यांनी म्हटले की, “त्याला पूर्णपणे ठीक होण्यास किती वेळ लागेल हे मी आता सांगू शकत नाही. माझ्याकडे या गोष्टीची अधिक माहिती नाहीये. परंतु स्मिथ टी२० विश्वचषक आणि ॲशेस मालिकेसाठी फिट राहणे गरजेचे आहे.”
महत्वाच्या बातम्या:
PSL: शान मसूदच्या खेळीने मुलतान सुलतान विजयी, तर क्वेटा ग्लॅडियेटरचे आव्हान संपुष्टात
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा