ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव स्मिथ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मिथने अप्रतिम प्रदर्शन करत शतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे शतक ठरले असून काही विक्रम देखील नावावर केले. या शतकीय खेळीनंतर स्मिथने त्याच्या निवृत्तीविषयी मोठी माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना असून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात स्टीव स्मिथ (Steve Smith) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने 192 चेंडूत 104 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि दोन षटकार आले. स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज असला, तरी मागच्या काही वर्षात त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. सध्या स्मिथ त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे आणि अशातच त्याच्याकडून निवृत्तीविषयी महत्वाची माहिती दिली गेली आहे.
माध्यमांशी बोलताना स्मिथ म्हणाला की, “मी क्रिकेटची मजा घेत आहे आणि सद्या निवृत्तीचा कोणताच विचार करत नाहीये. सध्या मी याविषयी विचार करत नाहीये, आम्हाला अजून काही दौरे करायचे आहेत, ज्यासाठी उत्साहित आहे. मी स्वतःवर अजून काम करू इच्छितो. धावा करण्यासाठी मी अजूनही भुकेला आहे आणि उत्सुकता देखील आहे.” दरम्यान, स्मिथने आफ्रिकी संघाविरुद्ध शतक केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज डॉन ब्रॅडमन यांना कसोटी शतकांच्या बाबतीत मागे टाकले. ब्रॅडमन यांच्या नावावर 29 कसोटी शतके आहेत आणि स्मिथ 30 कसोटी शतकांसह त्यांच्या पुढे गेला आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्यांचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सर्वात जास्त 41 कसोटी शतके केली आहेत, तर स्टीव वॉ यांच्या नावावर 32 कसोटी शतकांची नोंद आहे.
या खेळीनंतर स्मिथने सर्वाधिक धावांच्या बाबतीत मॅथ्यू हेडन आणि मायकल क्लार्क यांनाही मागे टाकले. आता या यादीत रिकी पाँटिंग, एलन बॉर्डर आणि स्टीव वॉ यांच्यानंतर स्मिथचे नाव येते. 33 वर्षीय स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 92 कसोटी सामने खेळले आहेत आणि यातील 162 इनिंगमध्ये 60 च्या सरासरीने 8647 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 30 अर्धशतकांसह चार द्विशतक आणि 37 अर्धशतकांची नोंद आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद द्विशतक ठोकले होते. (Steve Smith gave information about when he will retire from cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात दुसऱ्यांदा चमकला शनाका, आधी धोनी आणि आता कर्णधार हार्दिकला दिला धक्का
INDvSL: सामना संपण्याआधीच हार्दिकने मानली होती हार, आता होतोय ट्रोल