इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेतील दुसरा टप्पा येत्या सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने धक्कादायक खुलासा केला आहे.
स्टीव्ह स्मिथने खुलासा करत सांगितले की, त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामातील बऱ्याचशा सामन्यात फलंदाजी करण्यासाठी मैदानात जाण्यापूर्वी पेन किलर खाल्या होत्या. आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच स्मिथच्या कोपराला दुखापत झाली होती. ती दुखापत अजूनही कमी झाली नाही. त्यामुळे त्याने वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. (Steve Smith revealed that elbow issues troubled him in ipl 2021 and had to take pain killers).
स्मिथने शेवटचा सामना आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळला होता. त्याने या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे कर्णधारपद युवा रिषभ पंतच्या हाती होते. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच स्टीव्ह स्मिथने या हंगामातील ६ सामन्यात १११.८२ च्या सरासरीने १०४ धावा केल्या होत्या.
दररोज घ्यावे लागायचे औषध
स्टीव्ह स्मिथला आयपीएल स्पर्धा सुरू असताना देखील कोपराच्या दुखापतीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो प्रत्येक सामन्यापूर्वी औषध घेत असे. त्याने क्रिकेट डॉट कॉमला म्हटले की, “दुखापतीमुळे वेदना होत असतानादेखील मी माझे १०० टक्के देण्यात अपयशी ठरत होतो. ही दुखापत मला जास्तच त्रास देऊ लागली होती. त्यामुळे मी औषध घ्यायला सुरुवात केली होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला ॲशेस मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट व्हायचे आहे. त्यासाठी मी टी-२० विश्वचषक सोडण्यास तयार आहे. मला टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळायला आवडेल, परंतु कसोटी क्रिकेट हे माझे पहिले लक्ष्य आहे. माझे एकच लक्ष्य आहे की, ॲशेस मालिकेपूर्वी मी पूर्णपणे फिट व्हावे.”
स्मिथने आपल्या कारकिर्दीत एकूण ७७ कसोटी सामने खेळल आहेत. यात ७५४० धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२८ सामन्यांमध्ये ४३७८ धावा केल्या आहेत. यासोबतच टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ४५ सामने खेळले आहेत. यात त्याला ७९४ धावा करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका
सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’
विश्वविजेता भारतीय शिलेदार उतरणार ‘या’ परदेशी लीगच्या मैदानात, केलं रजिस्ट्रेशन