ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जडेजाने ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले आणि या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ देखील जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. स्टीव स्मिथला बाद करण्यासाठी जडेजाने एक अप्रतिम चेंडू टाकला आणि त्याला त्रिफळाचीत केले. स्मिथची ही विकेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आपल्या संघाला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाही. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने ख्वाजाची विकेट घेतली, तर मोहम्मद शमी याने वॉर्नरला त्रिफळाचीत केले. त्यानंतर तिसरी विकेट संघाने मार्नस लाबुशेनच्या रूपात गामावली. जडेजाच्या चेंडूवर लाबुशेनला यष्टीरक्षक केएस भरत (KS Bharat) याने यष्टीचीत केले. त्यानंतर आलेल्या मॅट रेनशॉ (Matt Renshaw) याला एकही धाव करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाने स्टीव स्मिथच्या रूपात पाचवी विकेट गमावली. स्मिथ 107 चेंडूंचा सामना केल्यानंतर 37 धावा केल्या होत्या. स्मिथ खेळपट्टीवर सेट झाला असताना ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीच अपेक्षा होती. पण जडेजाच्या एका फिरकी चेंडूने स्मिथला चकवा दिला आणि हा चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला. क्लीन बोल्ड झाल्यानंतर स्मिथला स्वतःला देखील विकेट गमावण्यावर विश्वास बसला नव्हता. पहिल्या डावातील जडेजाची ही तिसरी विकेट होती.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1623588067121704960
त्याआधी 36 व्या षटकात रविंद्र जडेजाने लागोपाठ चेंडूंवर ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज तंबूत पाठवले होते. 36 व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर जडेजाने मार्नस लाबुशेन आणि मॅट रेनशॉ यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर गुंडाळला गेला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच रविचंद्रन अश्विन यानेही संघासाठी तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Steve Smith was clean bowled on Ravindra Jadeja’s amazing spin ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत