स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने शुक्रवारी (3 मार्च) भारताला पराभूत केले. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवांनंतर ऑस्ट्रेलियासाठी हा विजय नक्कीच खास आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशात परतला असताना स्मिथने ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर स्मिथने खास प्रतिक्रिया समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा स्टीव स्मिथला अभिमान
फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भायदा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर घेतला. पण तिसऱ्या कसोटीत अशा खेळपट्टीवमुळेच भारताला पराभव पाहावा लागला. इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद चोखपणे निभावणारा स्टीव स्मिथ (Steve Smith) विजयानंतर माथ्यमांसी बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “असा विजय मिळवणे खूप कठीण आहे. नाणेफेक गमावल्यानंतरी या सामन्यात सर्वोच्च स्थानि पोहोचणे या संघाची प्रतिभा आणि आत्मविश्वास दाखवते.”
स्मिथ पुडे म्हणाला, “दिल्लीत एक सत्र खराब गेल्यानंतर आम्ही तो सामना गमावला. यातून सावरण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला. दरम्यानच्या काळात आम्ही चांगली केली आणि पुन्हा मैदानात परतलो. हे संघाची मानसिकता मजबूत करण्याविषयी, तयारीवर विश्वास दाखवण्याविषयी, आपण या सामन्यात यश मिळवू आणि निकाल आपल्या बाजूने लागेल, याविषयी होते.”
दरम्यान, तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपली जागा पक्की केली आहे. याविषयी स्मिथ म्हणाला, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाटी पात्र ठरल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. मागच्या काही काळापासून आमचा संघ याच प्रयत्नात होता. अंतिम सामन्यात स्थान पक्के करणे संघासाठी जल्लोष करण्याची बाब आहे.”
हा संघ पॅट कमिन्सच – स्मिथ
दरम्यान, स्मिथ यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा पूर्णवेळ कर्णधार राहिला आहे. पण सध्या संघाचा नियमित कर्णधार कमिन्स आहे. कमिन्स तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्यामुळे स्मिथने संघाची धुरा सांभाळली, हे सामन्यासही स्मिथ विसारला नाही. “माझी वेळ झाली (कर्णधारपदाची). आता हा संघ पॅडीचा (पॅट कमिन्स) आहे. या आठवडच्या अशा परिस्थितीत संघाची धुरा सांभाळायला मिळाली, यासाठी मला आनंद आहे.” मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. उभय संघांतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्च रोजी अहमदाबादमद्ये खेळला जाणार आहे. (Steve Smith’s big reaction on captaincy after winning the third match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPLमधील ‘हे’ नियम IPL सारखेच, फक्त प्लेऑफ सामन्यांचा विषय जरासा वेगळा; जाणून घ्याच
डब्ल्यूपीएल पहिली लढत मुंबई आणि गुजरात संघात, जाणून घ्या केव्हा आणि कधी पाहता येणार सामना