इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावतात यजमान इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर गुंडाळला. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या डावात शून्यावर बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला आहे.
इंग्लंडची पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या अनुभवी गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीपासून धक्के देण्यास सुरुवात केली. इंग्लंडकडून केवळ सलामीवीर रॉरी बर्न्स न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करू शकतो. त्याने, ८१ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक चार बळी मिळविले. मॅट हेन्री, एजाज पटेल व नील वॅग्नर यांनी अनुक्रमे ३,२ व १ बळी आपल्या नावे केला.
ब्रॉडचा नकोसा कारनामा
इंग्लंडच्या पहिल्या डावात संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला ट्रेंट बोल्टने खातेही न खोलता माघारी पाठवले. यासह, ब्रॉड आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये ३७ व्या वेळी शून्यावर बाद झाला. त्याने ख्रिस मार्टिन याला मागे सोडले. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचे दिग्गज गोलंदाज कर्टनी वॉल्श हे आहेत. ते आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ४३ वेळा शून्यावर बाद झालेले. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा ३५ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये खाते खोलू शकला नव्हता.
न्यूझीलंडची दमदार सुरूवात
इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. कर्णधार टॉम लॅथम ६ धावांवर माघारी परतल्यानंतर दोन्ही युवा फलंदाज डेवॉन कॉनवे व विल यंग यांनी डाव सावरत, अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या ३५ षटकात १ बाद ९६ अशी झाली होती. पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा कॉनवे या डावात देखील अर्धशतक करून खेळत आहे. तर, नियमित कर्णधार केन विलियम्सनच्या जागी संधी मिळालेला यंग २८ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
‘या’ फायद्यासाठी सिराजऐवजी अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी द्या, माजी निवडकर्त्यांचा सल्ला