भारताचा स्टार फुटबॉपटू कर्णधार सुनिल छेत्रीने रविवारी एक विशेष कामगिरी करत स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
मुंबई येथिल मुंबई स्पोर्ट्स अरेना मैदानावर रविवारी भारत-केनिया यांच्यात झालेल्या इंटरकॉनंटिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्यात सुनिल छेत्रीने 2 गोल करत अर्जेंटिनाच्या लिओने मेस्सीच्या 64 आंतराष्ट्रीय गोलची बरोबरी केली.
आता सुनिल छेत्री आंतराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या आणि सध्या खेळत असलेल्या खेळाडूंच्या यादीत 64 गोलसह लिओनेल मेस्सीसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. तर पहिल्या स्थानी पोर्तूगालचा ख्रितियानो रोनाल्डो आहे. त्याने 150 सामन्यांमध्ये 81 गोल केले आहेत.
दुसऱ्या स्थानी असलेल्या मेस्सीने 124 सामन्यात 64 गोल केले आहेत. तर भारताच्या सुनील छेत्रीने आपल्या 101 व्या सामन्यात 64 वा गोल करत हि किमया केली आहे.
भारत-केनिया यांच्या सामन्यात भारताने 2-0 अशा फरकाने केनियाचा पराभव करत इंटरकॉंटीनंटल चषक आपल्या नावे केला. या सामन्यात भारताकडू सुनिल छेत्रीने 8 व्या आणि 29 मिनिटाला गोल करत या विजेतेपदासह हा विशेष विक्रम आपल्या नावे केला.
आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनिल छेत्री बरोबर संयुक्तपणे दुसऱ्या असणाऱ्या मेस्सीला लवकरच सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. मेस्सी 14 जून पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होत असल्याने त्याला तिथे जास्तीचे सामने खेळायला मिळणार आहेत.
तर दुरीकडे सुनिल छेत्री अॉगस्ट 2018 मध्ये एशियन गेम्समध्ये सहभागी होत असल्याने त्यालाही पुन्हा मेस्सीची बरोबरी करण्याची संधी असेल.
सुनील छेत्रीने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या ६४ गोलची बरोबरी केली आहे. सध्या खेळत असलेल्या फ़ुटबाॅलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत छेत्री मेस्सीसह दुसऱ्या क्रमांकावर. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. #म #मराठी @Maha_Sports #IntercontinentalCupFinal pic.twitter.com/eaAMb8O8A2
— Pranali Kodre (@Pranali_k18) June 10, 2018








