कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो बबलमध्ये कोरोना विषाणूच्या प्रवेशामुळे हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल पुढे ढकलण्यापूर्वी या स्पर्धेने चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना अनेक चर्चेचे अनेक विषय दिले. या सर्वांमध्ये सर्वात मोठा चर्चेचा विषय होता, सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकणे. विशेष म्हणजे वॉर्नरला केवळ कर्णधारपदावरुनच काढून टाकले गेले नाही, तर त्याला अंतिम 11 मधून देखील वगळण्यात आले.
सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून वॉर्नरला काढून टाकण्याच्या मुद्द्यावर वेगवेगळी मते आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गावसकर यांच्या मते जेव्हा संघ खराब कामगिरी करतात त्यावेळी प्रशिक्षकांनादेखील तशीच वागणूक दिली जावी. गावसकर यांनी लिहिले, “डेव्हिड वॉर्नरला केवळ कर्णधारपदावरुन काढून टाकण्याच्याच नाही, तर त्याला अंतिम 11 मधून देखील काढून टाकण्याच्या हैदराबादच्या निर्णयाबद्दल त्यांना विचार करण्यासाठी वेळ मिळेल.” ‘
गावसकर यांनी लिहिले की, “डेव्हिड वॉर्नर धावा करत होता, परंतु गतवर्षीप्रमाणे तो आक्रमक नव्हता. पण तरीही इतर खेळाडूंकडून साथ मिळाल्यानंतर त्याच्या धावा खूप मोलाच्या ठरल्या. तथापि, त्याला अंतिम 11 मधून वगळण्यात आले, जे आश्चर्यकारक होते. कर्णधारपदाची पर्वा न करता तो संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करू शकतो.” त्यांनी पुढे लिहिले, “वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्याबाबतची चर्चा फार काळ होऊ शकते. पण, हा प्रश्न विचारला पाहिजे की जर कर्णधार बदलू शकतात, तर प्रशिक्षकांचे काय?”
गावसकर म्हणाले, “फुटबॉलमध्ये जर संघाची कामगिरी घसरण्यास सुरूवात झाली, तर संघ व्यवस्थापनाला प्रथम बाहेर केले जाते. मग क्रिकेटमध्ये का नाही?” दरम्यान हे जाणून घेणे गरजेचे आहे की, आयपीएल 2021 मध्ये हैदराबाद संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली. हैदराबादने खेळलेल्या 7 सामन्यात त्यांना केवळ 1 सामन्यात विजय मिळवता आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, या कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण
श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले हे खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका






