माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या प्रसिद्ध ‘वॉकआउट वादा’विषयी मोठा खुलासा केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात १९८१ साली मेलबर्न येथे एक कसोटी सामना झाला होता. या सामन्यादरम्यान तत्कालिन कर्णधार गावसकर ऑस्ट्रेलियन खेळाडू डेनिस लिली यांच्या षटकात पायचित दिल्यामुळे त्वरित मैदानाबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर चेतन चौहानही मैदानाबाहेर गेले होते.
गावसकर यांच्या मते, तो चेंडू त्यांच्या पॅडवर लागण्यापुर्वी बॅटला लागला होता. अर्थात गावसकर पायचित झाले नव्हते. तेव्हापासून असे म्हटले जात की, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे रागाच्या भरात गावसकरांनी मैदान सोडले होते. हाच वाद ‘वॉकआउट वाद’ म्हणून प्रसिद्ध आहे. या विवादाच्या तब्बल १९ वर्षांनंतर गावसकरांनी मैदान सोडण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे. ७ क्रिकेटद्वारा आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“ऑस्ट्रेलिया संघाचे तत्कालिन कर्णधार डेमियन फ्लेमिंग यांचे म्हणणे होते की, त्यावेळी चेंडू माझ्या बॅटच्या आतील किनाऱ्यावर लागला होता. फॉरवर्ड शॉर्ट लेग बाजूने हे स्पष्ट दिसत होते. पण मी त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होतो की, मी चेंडूला माझ्या बॅटने हिट केले आहे. शेवटी त्यांनी माझे म्हणणे ऐकले नसल्यामुळे मी चेतनला घेऊन मैदानाबाहेर पडलो,” असे गावसकर म्हणाले.
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे की मी पायचित दिल्यामुळे नाराज झालो होतो. पण खरे तर, त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू माझ्याविषयी अपशब्द बोलत होते आणि मला मैदानाबाहेर निघून जा म्हणत होते. याच कारणामुळे मी मैदान सोडले आणि चेतनलाही माझ्यासोबत यायला सांगितले.”
असे असले तरी, भारतीय संघाने ५९ धावांनी तो सामना जिंकला होता. माजी अष्टपैलू कपिल देव भारतीय संघाच्या विजयाचे नायक ठरले होते. त्यांनी सामन्याच्या चौथ्या डावात २८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात गावसकरांनी पहिल्या डावात १० आणि दुसऱ्या डावात ७० अशा एकूण ८० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
डोंबिवली- बोरीवलीकडे टीम इंडियाची धुरा, मुंबईकर रहाणे कर्णधार तर रोहित उपकर्णधार