आपल्या सर्वांना माहिती आहे की, भारतीय संघात ‘सर’ या नावाने अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला ओळखले जाते. परंतु जडेजापूर्वीही एक ‘सर’ होते. त्याबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी खुलासा केला आहे.
गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे. वेंकटराघवन यांनी मंगळवारी आपला ७५वा वाढदिवस साजरा केला होता. याच निमित्ताने गावसकरांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेंकटराघवन यांच्या बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “वेंकटराघवन ७५ वर्षांचे झाले, हे ऐकून खूप आनंद झाला. मी सर जडेजाच्या (Ravindra Jadeja) पूर्वीचे खरे सर वेंकटराघवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.”
गावसकरांनी १९७१मध्ये वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडीज दौरा त्यांच्यासाठी खूप शानदार राहिला होता.
गावसकर त्या दौऱ्याबद्दल बोलताना म्हणाले की, “मी आणि वेंकटराघवन एका स्थानिक संघ व्यवस्थापकाच्या घरी डिनरला गेलो होतो. तिथे आम्हाला एक ज्योतिषी मिळाला. त्याने आम्हाला पाहून भविष्यवाणी केली की हा दौरा आमच्यासाठी अप्रतिम असणार आहे.”
गावसकर पुढे म्हणाले की, “वेस्ट इंडीजवरील (West Indies) हा माझा पहिलाच दौरा होता. तेव्हा मला माहिती नव्हते की मी कसोटी सामना खेळेल की नाही. त्यावेळी मला त्या ज्योतिष्याच्या सांगण्यावर विश्वास नव्हता.”
“वेंकटराघवनने त्या दौऱ्यात २९ विकेट्स घेतल्या होत्या. जे कोणत्याही भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या विकेट्सपेक्षा अधिक होत्या,” असेही गावसकर यावेळी म्हणाले.
या दौऱ्यात गावसकरांनी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४ सामने खळले होते. यामध्ये त्यांनी एकूण ७७४ धावा केल्या होत्या.
वेंकटराघवन यांनी भारताकडून एकूण ५७ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत १५६ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीनिवास वेंकटराघवन म्हटलं की आपल्याला चटकन एका आंतरराष्ट्रीय पंचाची आठवण येते. परंतु या पंचाने भारतीय संघाचं दोन विश्वचषकात नेतृत्त्व केले आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे. जागतिक क्रिकेटमधील पहिल्याच विश्वचषकात या खेळाडूने संघाचे नेतृत्त्व केले होते. गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेंकटराघवन यांनी कारकिर्दीत ११ सामने खेळले. यातील ६ सामने ते या दोन विश्वचषकात खेळले. यात त्यांना ६ सामन्यात एकही विकेट घेता आली नाही तर बॅटने त्यांनी ४३ धावा केल्या. १९९३ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणुन पदार्पण केले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियात निवड न झाल्याने रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
-कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी
-फक्त या दोन गोलंदाजांमुळे मोहम्मद शमीचं करियरच गेलं बदलुन