माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे देशांतर्गत क्रिकेटपटूंना, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिप्पटीनं वाढ करण्याची मागणी केली आहे. बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटपटूंच्या मानधनात नुकतीच वाढ केली होती. या घोषणेचं स्वागत करताना गावसकर म्हणाले की, “बीसीसीआयनं कसोटीसह रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचीही काळजी घेतली पाहिजे.”
सुनील गावसकर म्हणाले की, ‘जर मानधन दुप्पट किंवा तिप्पट केलं तर नक्कीच बरेच खेळाडू रणजी ट्रॉफी खेळतील. मॅच फी जर चांगली असेल तर विविध कारणांमुळे रणजी न खेळाणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी होईल. जर रणजी खेळाडूंना योग्य मोबदला दिला गेला तर अलीकडे जितके खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडेल तितके बाहेर जाणार नाहीत, विशेषत: ईशान किशनसारखे खेळाडू.”
सुनील गावसकर यांनी दोन रणजी सामन्यांमध्ये जास्त दिवसांचं अंतर ठेवण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. ही मागणी अनेक संघांचे खेळाडू करत आहेत. गावसकर म्हणाले की, “दर तीन दिवसांतून एक दिवस प्रवासात जातो. अशा परिस्थितीत, फिजिओला भेटण्यासाठी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे, कदाचित दोन सामन्यांमध्ये थोडं जास्त अंतर असावं, जेणेकरून खेळाडूला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.”
रणजी हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन डिसेंबरच्या मध्यापर्यंत चालवण्याची सूचना गावसकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, “माझं मत आहे, रणजी ट्रॉफी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत व्हावी. त्यानंतर मर्यादित षटकांच्या स्पर्धा घेण्यात याव्यात. अशा प्रकारे, भारतीय संघ वगळता सर्व खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध होतील. न खेळण्याची कोणतीही सबब राहणार नाही. जानेवारीपासून लिस्ट ए सामने होणार असतील तर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना फायदा होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागावर हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!
महेंद्रसिंंह धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा पुढील कर्णधार? ‘हे’ खेळाडू आहे शर्यतीत