कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघाने जवळपास सात महिने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.मात्र, आगामी काळात सर्व खबरदारी घेऊन जैव सुरक्षित वातावरणात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात क्रिकेट सामने होणार आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे.
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. पण वनडे आणि टी२० मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर विराट भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला जानेवारी २०२१ मध्ये जन्म देणार असल्याने विराटने कसोटी मालिकेतील शेवटचे तीन सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकत्व रजा घेतल्यामुळे विराटवर झाली टीका
पालकत्व रजा घेतल्यामुळे विराटला बरीच टीका सहन करावी लागली. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर विराटला चांगलाच ट्रोल केलं. मात्र, पालकत्व रजा घेणारा विराट हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही. याआधीही काही भारतीय क्रिकेटपटूंनी पालकत्व रजा घेतली आहे.
राहुल द्रविडने घेतली होती पालकत्व रजा
भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेला आयपीएल हंगाम अर्धवट सोडून भारतात परतला होता. कारण त्या वर्षी त्याचा मुलगा अन्वयचा जन्म झाला होता.
रोहित शर्माही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून आला होता परत
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने 2018 मध्ये पालकत्व रजा घेतली होती. त्या वर्षी त्याची मुलगी समायराचा जन्म झाला होता. त्यावेळी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परतला होता. त्यामुळे तो काही सामन्यांना मुकला होता.
सुरेश रैनाही आयपीएल दरम्यान गेला होता मुलीला भेटायला –
मे 2016 मध्ये भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या मुलीचा जन्म झाला होता. त्यावेळी तो गुजरात लायन्स संघाचा कर्णधार होता. पण त्यावेळी त्याने आयपीएलच्या काही सामन्यांत न खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्याच्या मुलीला पहायला गेला होता.
पालकत्व रजा देण्यास बीसीसीआयने गावसकरांना दिला नकार
बीसीसीआयने 1976 मध्ये महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना सुट्टी नाकारली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा रोहनचा जन्म झाला होता. यानंतर, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गावसकरांना वेस्ट इंडिजला जावे लागले आणि सुमारे अडीच महिन्यांनी त्यांना मुलाला पाहण्याची संधी मिळाली.
धोनीने घेतली नव्हती पालकत्व रजा
सन 2015 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची मुलगी जिवा हिचा जन्म झाला होता. मात्र त्यादरम्यान विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे धोनीने त्याच्या मुलीच्या जन्मावेळी पालकत्व रजा घेतली नव्हती. त्यामुळे त्याने तिला पहिल्यांदा जवळपास तिच्या जन्मानंतर पावणेदोन महिन्यांनी पाहिले होते.
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
दुर्दैवच आणखी काय! न्यूझीलंडच्या २६ वर्षीय गोलंदाजाला झाले कॅन्सरचे निदान
‘विराट कोहलीची विकेट महत्त्वाची’, ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य
Video : “आता तुझ्याकडून बॅट घ्यावी लागेल”, सूर्यकुमारने ‘त्या’ व्हिडीओमुळे चहलला केले ट्रोल