आयपीएलच्या धर्तीवर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत आयोजित केल्या गेलेल्या एसए टी20 लीगचा अंतिम सामना रविवारी (12 फेब्रुवारी) खेळला गेला. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने प्रिटोरिया कॅपिटल्सला 4 गडी राखून पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सनरायझर्सचा कर्णधार ऐडन मार्करम स्पर्धेचा मानकरी ठरला.
CHAMPIONS‼️‼️‼️@SunrisersEC are the winners of the inaugural #Betway #SA20 🏆
The title is heading to Gqeberha‼️
@Betway_India pic.twitter.com/ODHLNdtQke
— Betway SA20 (@SA20_League) February 12, 2023
या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (11 नोव्हेंबर) खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने हा सामना रविवारी घेण्याचा निर्णय घेतला गेलेला. सनरायझर्सचा कर्णधार मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले.
गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिलेल्या प्रिटोरिया संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. 66 धावांवर त्यांचे चार प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. सनरायझर्स संघाच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत प्रिटोरिया संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध खेळाडू असलेल्या रूडॉल्फ वॅन डर मर्व याने चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत प्रिटोरिया संघाचा डाव अवघ्या 135 धावांवर रोखला.
(बातमी अपडेट होत आहे…)
(Sunrisers Eastern Cape Won First SA T20 League Beating Pretoria Capitals In Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली ‘ही’ मागणी; म्हणाली, ‘प्लीज माझ्यासाठी…’
हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा