---Advertisement---

काय सांगता! हैद्राबादचा ‘हा’ खेळाडू तब्बल ६२ सामन्यात एकदाही झाला नाहिये शून्यावर बाद

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 11:30 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा नववा सामना आज चेन्नईच्या मैदानावर खेळविण्यात आला. पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैद्राबादने या सामन्यासाठी आपल्या संघात चार बदल केले. जेसन होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि वृद्धिमान सहा या खेळाडूंना हैद्राबादने संघाबाहेर केले.

तर या खेळाडूंऐवजी अभिषेक शर्मा, विराट सिंग, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान या खेळाडूंना संघात स्थान दिले. यापैकी विराट सिंग या खेळाडूने या सामन्याद्वारे आयपीएल मध्ये पदार्पण केले.

विराट सिंगच्या नावे खास विक्रम
विराट सिंग हा झारखंडचा २३ वर्षीय युवा फलंदाज आहे. त्याने आजवर ६२ टी२० सामने खेळले आहेत. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे या सगळ्या सामन्यांमध्ये तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. कुठल्याही भारतीय फलंदाजाला इतका दीर्घ काळ असा रेकॉर्ड करता आलेला नाही. त्यामुळे हा अनोखा रेकॉर्ड नावावर असलेला विराट सिंग एकमेव भारतीय फलंदाज आहे.

https://twitter.com/rgcricket/status/1383462112228372494

विशेष म्हणजे आजच्या सामन्यातही त्याने हा रेकॉर्ड कायम ठेवला. आज देखील तो शून्यावर बाद झाला नाही. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. १२ चेंडूत ११ धावांची खेळी करून तो माघारी परतला. कृणाल पंड्याने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

दरम्यान, रंगतदार सामन्यात मुंबईने हैद्राबादला १३ धावांनी पराभूत केले. मुंबईने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबाद सुस्थितीत होते. मात्र त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने त्यांचा डाव १३७ धावांवर संपुष्टात आला. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या:

दोन सामन्यात रोहित बाद होण्यामागे आहे विराटचा हात, वाचा सविस्तर

दीपक चाहरला सीएसकेमध्ये मिळणार नवी जबाबदारी, धोनीने दिले संकेत

MI vs SRH : मुंबईच्या तोफखान्याचा भेदक मारा! हैदराबादला १३७ धावांमध्ये गुंडाळत साकारला हंगामातील दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---