आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी पहिलाच हंगाम खेळत असलेल्या इंग्लंडच्या हॅरी ब्रुक याने शतक पूर्ण केले.
𝐌𝐚𝐢𝐝𝐞𝐧 𝐂𝐞𝐧𝐭𝐮𝐫𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟑 💯
First 💯 in IPL for Harry Brook 🙌
What an incredible knock this has been 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/odv5HZvk4p#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/DGWDjSQMbo
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट गाजवत असलेल्या ब्रुक याला यावर्षी आयपीएलमध्ये तगडी बोली लागली होती. हैदराबादने 13 कोटी 25 लाखांची बोली त्याच्यावर लावून सर्वांना चकित केलेले. हंगामाच्या पहिल्या तीन सामन्यात तो आपल्या लवकिला खेळ करू शकला नव्हता. पहिल्या तीन सामन्यात त्याला केवळ 30 धावा करण्यात यश आलेले.
मात्र, या सामन्यात मैदानावर उतरल्यानंतर त्याने सुरूवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर त्याने अभिषेक शर्मासह मोठी भागीदारी केली. फिरकीपटूंविरुद्ध सावध पवित्रा घेतल्यानंतर त्याने वेगवान गोलंदाज गोलंदाजीला आल्यावर पुन्हा आक्रमक फटके खेळले. हैदराबादच्या डावातील अखेरच्या षटकात त्याला शतक पूर्ण करण्याची संधी मिळाली.
त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 55 चेंडूवर 100 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. आयपीएल 2023 मधील हे पहिले शतक ठरले.
सनरायझर्स हैदराबादच्या डावाचा विचार केल्यास ब्रुक मयंक अगरवाल यांनी 4 षटकात 46 धावांची सलामी संघाला दिलेली. मात्र, रसेलने पाचव्या षटकात मयंक व त्रिपाठी यांना बाद केले. त्यानंतर कर्णधार एडेन मार्करम याने 25 चेंडूत 50 धावांची वेगवान खेळी केली. अभिषेक शर्मा याने 32 व क्लासेनने 16 धावा केल्याने हैदराबादला 228 अशी मोठी मजल मारता आली.
(Sunrisers Hyderabad Harry Brook Hits IPL 2023 First Century Against KKR)