भारतीय क्रिकेट संघाने जगाला अनेक दिग्गज खेळाडू दिले. या खेळाडूंनी आपल्या अफलातून फलंदाजीने जगाच्या पाठीवर आपले नाव कमावले. त्यामुळे त्यांना मोठा चाहतावर्गही लाभला. या खेळाडूंमध्ये सुरेश रैना याचाही समावेश होतो. रैनाने रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) त्याचा 36वा वाढदिवस साजरा केला. रैनाने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले आहेच, पण त्यासोबतच त्याने जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध लीग असलेल्या आयपीएलमध्येही विक्रमांचा रतीब घातला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया रैनाच्या खास आयपीएल विक्रमाविषयी.
रैना आणि आयपीएल
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा पहिला घाट 2008 मध्ये घातला गेला होता. त्यावेळी सुरेश रैना आयपीएल (Suresh Raina IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या ताफ्यात सामील झाला होता. त्यावेळी जवळपास 2.6 कोटी रुपयांना चेन्नईने त्याला संघात घेतले होते. या पहिल्याच हंगामात त्याने 16 सामन्यात 38.27च्या सरासरीने 421 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामात त्याला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित केले होते.
सलग 10 वर्षे सामनावीर
पहिल्या हंगामात तळपलेली सुरेश रैना (Suresh Raina) याची बॅट ही पुढील 10 वर्षे तशीच तळपत राहिली. रैनाने 2008 ते 2017 या सलग 10 वर्षांमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू आहे.
रैना आणि आयपीएल
रैना आयपीएल स्पर्धेत फक्त 2 संघांकडून खेळला. ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात लायन्स (Gujarat Lions) होय. चेन्नईने रैनाला 2011 आणि 2014 या हंगामामध्ये संघात रिटेन केले होते. त्यानंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई संघावर 2016 आणि 2017 हंगामात बंदी घालण्यात आली. त्यामुळे ही दोन वर्षे रैना गुजरात लायन्स संघाकडून खेळला. या दोन वर्षीही त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
Fan on the field – Autograph please! @ImRaina @TheGujaratLions #GLvDD pic.twitter.com/fknjZgkeoz
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2017
रैनाची निवृत्ती
विक्रमांचा रतीब घालणाऱ्या रैनाने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने याच दिवशी निवृत्ती जाहीर केली होती. धोनीच्या निवृत्तीच्या काही मिनिटांनंतर लगेच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. धोनीला ‘थाला’ म्हणून ओळखलं जातं. तसेच, रैना हा धोनीनंतरचा चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडू होता, त्यामुळे त्याला चाहते ‘चिन्ना थाला’ म्हणतात.
सलग 10 आयपीएल हंगामात सामनावीर बनणारा एकमेव खेळाडू रैना
2008
2009
2010
2011
2012
2013
2014
2015
2016
2017
रैना सध्या परदेशी लीगमध्ये आपला हात आजमावत आहे. तो अबू धाबी टी10 लीग स्पर्धेत आपल्या चौकार-षटकारांनी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (Suresh Raina is the only player to win M.O.M Award in 10 Consecutive IPL Seasons)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहित आहेत का?
भारताचे टेंशन वाढले! न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाऊस विजेता