---Advertisement---

बीसीसीआयने ‘हे’ पाऊल उचलले, तर सुरेश रैना नाही खेळू शकणार आयपीएल २०२२

On: शनिवार, मार्च 5, 2022 6:34 PM
Suresh-Raina
---Advertisement---

आयपीएल २०२२ ही स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खेळली जाणार आहे. तत्पूर्वी आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागली, तर अनेकांना लिलावात कोणीच खरेदी केले नाही. या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने संघात काही नवीन खेळाडू घेतले, तर काही जुन्या खेळाडूंना संघात कायम ठेवले. सीएसकेने ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला संघात खरेदी केले नाही.

सुरेश रैनाबाबत (Suresh Raina) सर्व चाहते एका गोष्टीची वाट पाहत आहेत. ती म्हणजे, बीसीसीआय (BCCI) अशी घोषणा करेल की, सुरेश रैना आता या संघासोबत खेळणार आहे. परंतु या सर्व गोष्टींना बीसीसीआय पूर्णविराम देण्याबाबत विचार करत आहे. जर असे झाले, तर रैनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतोे.

माध्यमांद्वारे असे समजले की, यावेळी ट्रेंड विंडो न उघडण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. कारण, यावेळी मेगा लिलाव पार पडला. सर्व संघांना बरोबरीच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र, तरीही मेगा लिलावात सीएसकेसोबतच (Chennai Super Kings) कोणत्याच फ्रॅंचायझीने सुरेश रैनाला संघात घेतले नाही. त्यामुळे रैनाच्या चाहत्यांना खूप मोठा झटका बसला होता. जेव्हा जेसन राॅयने आयपीएल २०२२ मधून आपले नाव माघारी घेतले होते, तेव्हा सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की, सुरेश रैना गुजरात संघासोबत जोडला जाऊ शकतो. जर बीसीसीआयने ट्रेड विंडो उघडली नाही, तर चाहत्यांच्या इच्छा अपूर्णच राहू शकते.

सन २००७ पासून आतापर्यंत हा दुसरा हंगाम असेल, ज्यामध्ये सुरेश रैना खेळताना दिसणार नाही. २०२० च्या आयपीएलमधून कोरोनामुळे त्याने आपले नाव माघारी घेतले होते आणि यावर्षा पहिल्यांदाच तो लिलावात विकला गेला नाही. आयपीएल इतिहात सर्वात जास्त धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे.

सुरेश रैनाच्या आयपीएल कारकिर्दीबाबात बोलायचे झाले, तर त्याने २०५ सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत आणि २५ विकेट देखील घेतले आहेत. यादरम्यान त्याचा सर्वात मोठी धावसंख्या १०० धावा एवढा होता. त्याने आयपीएलमध्ये ३९ अर्धशतके, २०३ षटकार आणि ५०६ चौकार लगावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---