ब्रिस्टल। रविवारी 8 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा टी20 स्पेशालिस्ट सुरेश रैनाला टी20 क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची संधी आहे.
सध्या रैनाने 295 टी20 सामन्यात 299 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याला 300 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 1 षटकाराची आवश्यकता आहे.
जर त्याने हा टप्पा पार केला तर तो टी20 क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा रोहित शर्मानंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याचबरोबर आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त षटकार फक्त 7 खेळाडूंनी मारले आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने मारले आहेत. त्याने 335 सामन्यात तब्बल 846 षटकार मारले आहेत.
या यादीत 308 षटकारांसह भारताचा रोहित शर्मा 7 व्या स्थानी आहे. तर सुरेश रैना 299 षटकारांसह दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सबरोबर विभागुन 8 व्या क्रमांकावर आहे.
रैनाने आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 295 सामन्यात 33.59च्या सरासरीने 7929 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 709 चौकार आणि 299 षटकारांचा समावेश आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
846 षटकार – ख्रिस गेल(335 सामने)
528 षटकार – किरॉन पोलार्ड (422 सामने)
445 षटकार -ब्रेंडन मॅक्यूलम(335 सामने)
371 षटकार – शेन वॉटसन (273 सामने)
367 षटकार – ड्वेन स्मिथ (318 सामने)
319 षटकार – डेविड वॉर्नर (243 सामने)
308 षटकार – रोहित शर्मा (288 सामने)
299 षटकार – एबी डेविलियर्स (251 सामने)
299 षटकार – सुरेश रैना (295 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
-Video: कोण आहे तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू; जो गातो हिंदी कव्वाली!
-रोहित शर्माला मागील तीन सामन्यात हुलकावणी देणारा विक्रम आज करण्याची संधी
-हार्दिक पंड्याने एमएस धोनीला दिली ही खास भेट