भारताचा प्रतिभावंत फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. अफाट कौशल्याने परिपूर्ण असूनही नोव्हेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकाही भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
ही बाब चाहत्यांना मुळीच आवडलेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी शोषल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/NeelRai31/status/1320754555362095104
#INDvsAUS #AUSvIND #TeamIndia
After Seeing Surya Kumar Yadav Not Selected In Team India For Upcoming Australia Series..Me To BCCI – pic.twitter.com/7KvSBALrK2
— K L Rahul FANS (@itsPRB) October 26, 2020
https://twitter.com/Sivaman01075274/status/1320791448539676673?s=20
While selecting India squad, Indian selectors to Surya Kumar Yadav: pic.twitter.com/iTdFNhaW1y
— Rinku Singh fan (Perry's Version) (@Jokeresque_) October 26, 2020
https://twitter.com/Rocky_banarasi/status/1320775483089248256?s=20
https://twitter.com/Anil_n_a_i_d_u/status/1320792494162857984?s=20
यादवने आयपीएल 2020 मध्ये 11 सामन्यांत 283 धावा केल्या आहेत. 2019 च्या आयपीएल हंगामात त्याच्या त्याने 424 धावा केल्या होत्या. 2018 ते 2020 दरम्यान आयपीएलमध्ये सूर्यकुमारने 1219 धावा केल्या आहेत.
याशिवाय मुंबई रणजी संघातील एक मोठा खेळाडू म्हणून सुर्यकुमारची ओळख आहे. सप्टेंबर महिन्यात आपला 30वा वाढदिवस साजरा केलेल्या सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 77 सामन्यात 44च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या 93 सामन्यात त्याने 35.46च्या सरासरीने 2447 धावा केल्या आहेत तर ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात त्याने 160 सामन्यात 31.38च्या सरासरीने 3295 धावा केल्या आहेत.
जवळपास 11 वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजविणाऱ्या सुर्यकुमारची भारताकडून खेळण्याची प्रतिक्षा आजही संपलेली नाही.
टी20 संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती.
वनडे संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
कसोटी संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, रीद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.