वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्ये, सूर्यकुमार यादवने भारतीय कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून प्रवेश केला. यादरम्यान तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून एक विचित्र शॉट दिसला. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. ताहत्यांनी या शॉटचा व्हिडिओ शेअर करत सूर्यकुमारवर कोतुकांचा वर्षाव केला आहे.
खरं तर, तिसर्या षटकात ओबेड मॅकॉय गोलंदाजी करायला आला आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारने आपल्या मनगटाच्या सहाय्याने ऑफ-स्टंपचा पूर्ण चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने फ्लिक केला. आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडला.सूर्याचा हा फटका इतका प्रेक्षणीय होता की हा फटका पाहणारा प्रत्येक जण या शॉटकडे अवाक होऊन पाहत आहे. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यादरम्यान, काही चाहते सूर्यकुमारच्या या हेलिकॉप्टर शॉटची तुलना माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आवडत्या हेलिकॉप्टर शॉटशी करत आहेत.
#SuryakumarYadav pic.twitter.com/9ydfgpKKKq
— Prabhat Sharma (@PrabS619) August 7, 2022
दरम्यान, सूर्यकुमार यादव या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता पण सहाव्या षटकात अल्झारी जोसेफने २४ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर एलबीडब्ल्यू आऊट करत सूर्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे भारताची दुसरी विकेट पडली. याआधी या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने भारतासाठी अर्धशतकी खेळी करत सामनावीराची भुमिका बजावली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे, सूर्या टी-२० क्रमवारीत बाबर आझमनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही तर या वर्षातील क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटने १२ सामन्यात ४२८ धावा केल्या आहेत. या वर्षी तो १८९.३८च्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.सध्या सूर्यकुमारला आयसीसी क्रमवारीत सर्वोच्च स्थान गाठण्यासाठी केवल २०-३० धावांची गरज आहे. त्यामुळे रविवारी (७ ऑगस्ट) होणाऱ्या मालिकेतील पाचव्या टी-२० सामन्यात सूर्यकुनार यादव बाबर आझमला बगल देत टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च स्थान मिळवू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चार शब्द मोलाचे! कर्णधार रोहितचे ‘ते’ मार्गदर्शन करणारे बोल आवेशला बनवून गेले झिरोचा हिरो
उगाचच पंतला म्हणत नाही टॉपचा विकेटकिपर! ‘हा’ मोठा पराक्रम करत कार्तिकला टाकले बरेच मागे
‘सिक्सर किंग’ रोहितची मोठी उडी, षटकारांच्या विक्रमात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरला केले ओव्हरटेक