---Advertisement---

सूर्यकुमारची बॅट पुन्हा तळपली! अर्जुन तेंडुलकरच्या एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 9:04 PM
---Advertisement---

पुढीलवर्षी १० जानेवारीपासून सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपासून भारतातील देशांतर्गत क्रिकेट मोसमालाही कोरोनाच्या संकटकाळामुळे लागलेल्या ब्रेकनंतर पुन्हा सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांनी आपल्या संभावित खेळाडूंची घोषणा केली आहे. मुंबईच्या खेळाडूंची तर स्पर्धेची पूर्वतयारीही सुरु झाली आहे.

सध्या मुंबईतील खेळाडूंमध्ये सराव सामने खेळवण्यात येत आहेत. त्यात मंगळवारी(२२ डिसेंबर) सुर्यकुमार यादव कर्णधार असलेल्या स्टाफ बी आणि यशस्वी जयस्वाल कर्णधार असलेल्या स्टाफ डी संघात सराव सामना झाला. या सामन्यात सुर्यकुमारने शानदार कामगिरी केली.

सुर्यकुमारची अर्जून तेंडुलकरविरुद्ध जोरदार फटकेबाजी – 

या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सुर्यकुमारने तुफानी फटकेबाजी केली. त्याने ४७ चेंडूत १२० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ९ षटकार मारले. दरम्यान त्याने १३ व्या षटकात स्टाफ डी संघातील अर्जून तेंडुलकरच्या गोलंदाजीवर तब्बल २१ धावा चोपल्या. यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तसेच सुर्यकुमार एक दुहेरी आणि एक एकेरी धाव पळाला.

या षटकात सुर्यकुमारने २१ धावा काढल्या असल्या तरी अर्जूनने १९ व्या षटकात सिद्धार्थ अक्रेला बाद केले. तसेच १३ वे षटक सोडले तर अर्जूनने टाकलेल्या अन्य ३ षटकात चांगली गोलंदाजी केली. त्याने एकूण ४ षटकात ३३ धावा देत १ विकेट घेतली.

असे असले तरी सुर्यकुमारच्या खेळीमुळे स्टाफ बी संघाने २० षटकात ५ बाद २१३ धावा केल्या.

आयपीएलमध्येही सुर्यकुमारची बॅट तळपली –

नुकतेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात सुर्यकुमारने शानदार कामगिरी केली. त्याने या आयपीएलमध्ये १६ सामन्यात ४० च्या सरासरीने ४८० धावा केल्या. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या आयपीएलमधील फॉर्म पुढेही कायम ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ पाकिस्तानी खेळाडूने टी२० क्रिकेटमध्ये वर्ष केले आपल्या नावे; भारतीय फलंदाज केएल राहुलला टाकले मागे

गंभीरने सांगितली दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन; ‘या’ खेळाडूंना दिली संधी

मोहम्मद रिझवानचे दमदार अर्धशतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने व्हाईटवाॅश टाळला

ट्रेंडिंग लेख –

बॉक्सिंग डे कसोटी! पाहा काय आहे भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास

IND v AUS: कसोटी सामन्यांदरम्यान स्टंप माईकमधून ऐकू आलेल्या ३ मजेदार शाब्दिक चकमकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---