---Advertisement---

सूर्याने सांगितली ग्रीनच्या शतकाची कहाणी! म्हणाला, “ती एक धाव म्हणजे…”

On: सोमवार, मे 22, 2023 12:06 PM
---Advertisement---

आयपीएल 2023चा 69वा सामना रविवारी (21 मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला. मुंबईने या सामन्यात निर्णायक विजय मिळवला.‌ मुंबईचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याने आयपीएलमध्ये आपले पहिले शतक ठोकले. मात्र, हे शतक पूर्ण करताना त्याला सूर्यकुमार यादव यांची मोलाची मदत झाली. सूर्याने त्यावेळी नक्की काय घडले याचा नुकताच खुलासा केला.

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजय अनिवार्य होता. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावल्यानंतर जबाबदारी घेत नाबाद शतक साजरे केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 47 चेंडूवर 8 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. मात्र, हे शतक पूर्ण करताना सूर्यकुमार यादव यांची मदत झाली. ग्रीन 99 धावांवर असताना एक धाव काढून देण्याची जबाबदारी सूर्यकुमार याच्यावर आलेली. कारण मुंबईला विजयासाठी केवळ दोन धावांची गरज होती. भुवनेश्वर कुमार यांच्या या चेंडूवर सूर्यकुमारने आपला अनुभव दाखवत हा चेंडू चौकारापर्यंत जाणार नाही हे पाहून केवळ एक धाव काढली. त्यानंतर ग्रीनने आपले शतक पूर्ण केले.

हा प्रसंग सांगताना सूर्यकुमार म्हणाला,

“ही मी घेतलेली आत्तापर्यंतची सर्वात अवघड एकेरी धाव होती. कारण, ग्रीन एक उत्कृष्ट खेळी करत तिथपर्यंत आला होता. या शतकावर त्याचा हक्क होता.”

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबद यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 18व्या षटकात 2 विकेट्स गमावून विजय मिळवला. मुंबईच्या या विजयानंतर आरसीबीचा अखेरच्या सामन्यात पराभव झाल्याने मुंबईला प्ले ऑफचे तिकीट मिळाले.

(Suryakumar Yadav Telling About Cameron Green Century Against Sunrisers Hyderabad)

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---