स्टार अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे मागीलवर्षी 14 जून 2020 ला निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. आज त्याच घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्याने क्रिकेटवर आधारित चित्रपटात काम केलेल्या भूमीकेवर नजर टाकू.
क्रिकेटची आवड बाळगणारा सुशांत अभिनयाच्या क्षेत्रात चांगला चमकला. छोट्या पडद्यापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात ही त्याने क्रिकेटशी संबंधित भूमिका करताना दिसून आला. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
2008 साली ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेपासून त्याने छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.
‘काय पो छे से’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात त्याने इशान नावाच्या मुलाची भूमिका बजावली. इशान एक क्रिकेटपटू बनू इच्छित होता. पण असे न झाल्याने तो प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात तो आपल्या मित्रांच्या सहायाने क्रिकेट अकादमी सुरू करून लहान मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करतो.
धोनीवर आधारित एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने त्याला भरपूर यश मिळवून दिले. आपल्या अभिनयाने त्याने अनेकांची मने जिंकली. त्याचा आतापर्यंतची सर्वात हा हिट चित्रपट होता. या चित्रपटाने दोनशे कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात एमएस धोनीची भूमिका करण्यासाठी त्याने दोन कोटी रुपये घेतले होते. चित्रपट हिट ठरल्यानंतर दहा कोटी रुपये मिळाले होते.
साल 1983 च्या विश्वविजेता भारतीय संघावर आधारित चित्रपट बनविण्यात येत होता. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेता ताहिर राज भसीन याने सुशांत सिंग राजपूत यांच्याकडून काही टिप्स घेतले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा