---Advertisement---

युएईला जाण्याआधीच बिघडणार आरसीबीचं गणित! हसरंगा-चमिराच्या खेळण्यावर टांगती तलवार

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 8:51 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज दुश्मंत चमीरा यांना संघात स्थान दिले आहे. मात्र, आरसीबीच्या घोषणेच्या एका दिवसानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. बोर्डाचे म्हणणे आहे की, या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्याकडून आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची परवानगी घेतली नाही किंवा बंगळुरू संघात त्यांच्या समावेशाबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही. श्रीलंका बोर्डाच्या या विधानामुळे हसरंगा आणि चमीरा आयपीएलमध्ये खेळत असल्याबद्दल अनिश्चितता कायम आहे.

‘क्रिकबझ’च्या बातमीनुसार, श्रीलंकेचे क्रिकेट सचिव मोहन डी सिल्वा आयपीएलमध्ये हसरंगा आणि चमिरा खेळण्याविषयी म्हणाले, “मला माहित नाही, मला तपासावे लागेल. आम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहोत. आम्ही अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. कारण त्यांनी अद्याप एनओसीसाठी अर्ज केलेला नाही. आम्हाला माहित नाही की, या खेळाडूंची निवड झाली आहे किंवा त्यांनी आमच्याकडून परवानगी घेतली नाही.”

आरसीबीने ॲडम झम्पाच्या जागी हसरंगाला संघात स्थान दिले आहे. तर डॅनियल सॅमची जागा चमीरा घेईल. संघाने सिंगापूरचा फलंदाज संघ डेव्हिडला देखील संघात जोडले आहे, जो फिन एलेनच्या जागी यूएईमध्ये खेळताना दिसेल.

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत वनिंदू हसरंगाची कामगिरी प्रचंड चांगली होती. हसरंगाने एकदिवसीय सामन्यात ३ आणि टी-२० सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या. यूएईच्या परिस्थितीत हसरंगा बंगळुरू संघासाठी ट्रम्प कार्ड म्हणून सिद्ध होऊ शकतो. मात्र, श्रीलंका बोर्डाच्या या वक्तव्यानंतर हसरंगा आणि चमीराच्या खेळावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यापूर्वी आरसीबीने खेळलेले ७ पैकी ५ सामने जिंकले होते. तर संघाला २ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या-

चलो यूएसए! मनन, उन्मुक्तनंतर आता ‘हा’ दिल्लीकर खेळणार अमेरिकेत, भारतीय क्रिकेटला केला रामराम

‘कोहलीची आक्रमकता मर्यादित असायला हवी, नाहीतर…,’ नेमकं असं का म्हणाले माजी क्रिकेटर

राष्ट्रप्रेम!! राशिदने मैदानावर केलेल्या ‘त्या’ कृत्याने जिंकले कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे मन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---