यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे केले आहे. भारतीय संघाच्या गटामध्ये युनायटेड स्टेट्स, नामीबिया, पाकिस्तान आणि नीदरलँड्सच्या संघांचा समावेश आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी यूएसए संघाविरुद्ध करणार आहे.
स्पर्धेतील सर्वात चर्चित आणि चाहत्यांचा मनाला भिडणारा सामना म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. हा सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र, पाकिस्तानी सरकारने अद्याप भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, असा निर्णय घेतले आहे . तरीही, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तज्ज्ञ आणि चाहत्यांमध्ये अशी आशा आहे की पाकिस्तान फक्त नाटक करत आहे आणि अंतिम क्षणात आपल्या संघाची घोषणा होऊ शकते.
भारतीय संघ आणि पाकिस्तान संघाच्या सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा सामना अत्यंत रोमांचक ठरेल, कारण भारत-पाकिस्तान सामन्याचे वेगळेच महत्व आहे. या सामन्याचे प्रसारण अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे हा सामना घरबसल्या फ्रीमध्ये पाहता येईल.
टी20 वर्ल्ड कपमधील भारताच्या सर्व सामन्यांचा थेट प्रसारण डीडी स्पोर्ट्स, डीडी फ्री डिश आणि दूरदर्शन राष्ट्रीय वाहिनीवरही होईल. विशेष म्हणजे, डीडी स्पोर्ट्स एचडी फक्त भारतीय संघाच्या सामन्यांचाच प्रसारण करेल. ज्यांच्याकडे डीडी फ्री डिश आहे, ते टी20 वर्ल्ड कपमधील भारताच्या सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.
मोबाईल वापरकर्ते जियो हॉटस्टार अॅपवर टी20 वर्ल्ड कपचे थेट पाहू शकतात. यावर हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये फीड उपलब्ध असेल. शिवाय, रेडिओवर रस घेणाऱ्यांसाठी आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ)वर देखील सर्व सामन्यांची लाइव्ह कमेंट्री ऐकता येणार आहे.






