---Advertisement---

भारतीय यष्टीरक्षक कार्तिककडून मोठी चूक, प्रेक्षकांनी लावल्या ‘धोनी…धोनी’च्या घोषणा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 28, 2022 6:50 PM
Dinesh-Karthik-And-MS-Dhoni
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022मध्ये गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वचषकातील सलग दुसरा सामना खिशात घातला. कर्णधा रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेला सलामीवीर केएल राहुल हा 9 धावेवर बाद होत तंबूत परतला. रोहित आणि विराट कोहली यांनी शानदार भागीदारी रचली, ज्यात रोहितच्या 53 धावांचा समावेश होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्यासोबत विराटने 95 धावांची नाबाद भागीदारी रचली. या सामन्याचे हिरो रोहित, विराट आणि सूर्यकुमार ठरले, पण प्रेक्षकांनी मैदानात माजी कर्णधार एमएस धोनी याच्या नावाच्या घोषणा दिल्या.

‘धोनी धोनी’ नावाच्या घोषणा
झाले असे की, या सामन्यात नेदरलँड्स संघाच्या डावातील आठवे षटक अक्षर पटेल (Axar Patel) टाकत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाजाने पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टीरक्षण करत असलेल्या दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या दिशेने गेला. यावेळी असे वाटले की, तो कॅच कार्तिक झेलेल, पण त्याने ही संधी गमावली. अशात दिनेश कार्तिकच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर मैदानावर लगेच चाहत्यांनी धोनी… धोनी…च्या घोषणा दिल्या.

https://twitter.com/minibus2022/status/1585566460427968514

एमएस धोनीची क्रेझ इतकी जबरदस्त आहे की, जर भारतीय यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली, तर प्रेक्षकांना धोनीची आठवण येऊ लागते. खरं तर, दिनेश कार्तिक हा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिनिशर म्हणून खेळत आहे. सोबतच तो यष्टीरक्षकाचीही भूमिका बजावत आहे. युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यापूर्वी दिनेश कार्तिकची संघात निवड झाली. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कार्तिकला सामना संपवण्याची संधी मिळाली होती, ज्यात तो अपयशी ठरला आणि नेदरलँड्सविरुद्ध त्याला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.

अशात सोशल मीडियावर सलग दोन अपयश मिळाल्यानंतर चाहत्यांनी रिषभ पंत याला खेळवण्याची मागणी करत आहेत. मात्र, मागील काही मालिकांमध्ये दिनेश कार्तिक याने भारतीय संघासाठी दमदार प्रदर्शन केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! जयवर्धनेचा विक्रम मोडण्यापासून विराट फक्त 27 धावा दूर, गेलला सोडलंय मागे
न्यूझीलंडच्या ताफ्यात धाकड फलंदाजाची एंट्री! सुपर 12च्या पहिल्या ग्रुपमध्ये संघांचे वाजणार बारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---