भारत आणि पाकिस्तान संघात टी20 विश्वचषकात होणारा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. असाच रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेला भारत आणि पाकिस्तान सामनाही महत्त्वाचा होता. हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचा विश्वचषकातील पहिला वहिला सामना होता. यादरम्यान राष्ट्रगीतावेळी रोहित खूपच भावूक झाला. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भावूक झाला. यावेळी तो जरा उदास दिसला. राष्ट्रगीताच्या शेवटी रोहितने भावूक होत त्याचे डोळे पूर्णपणे बंद केले होते. शेवटी तो स्वत:ला रोखू शकला नाही. यावेळी तो किती भावूक झाला होता, हे त्याच्या डोळ्यावरून समजते. हे सर्व व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे.
@ImRo45 All the best Captain and #TeamIndia @BCCI pic.twitter.com/FnQYOK2hsn
— अमित साहानी (@ImAmitSahani) October 23, 2022
Rohit Sharma soaking the atmosphere and singing the national anthem with eyes closed. pic.twitter.com/Al3BTIUp6c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2022
Rohit Sharma couldn't hold back his tears towards the end of the national anthem . What a moment 🇮🇳❤️ pic.twitter.com/0K28G9zXfK
— ` (@FourOverthrows) October 23, 2022
https://twitter.com/soldier_bishnoi/status/1584105720727113729
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील हा सामना पाहण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Melbourne Cricket Ground) येथे जवळपास 1 लाखांहून अधिक चाहते उपस्थित होते. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. खेळपट्टीवरील गवतामुळे भारतीय कर्णधाराने हा निर्णय घेतला. भारताने मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला सामील केले होते. तसेच, फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विन आणि अक्षर पटेल यांना ताफ्यात घेतले होते.
विशेष म्हणजे, विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. भारतीय संघाला फक्त एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
पाकिस्तानचा डाव
पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा केल्या होत्या. आता भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर हे आव्हान पार करावे लागेल.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….